कासोळा महाकाली मंदिरातील मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या तयारीची पाहणी

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क
महागाव :
गुंज जिल्हा परिषद सर्कलमधील कासोळा महाकाली मंदिर येथे १५ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या मुर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वतयारीची पाहणी करण्यात आली.गुरुवर्य मठाधिपती श्री गजानन माऊली यांच्या उपस्थितीत हा पाहणी दौरा पार पडला.या वेळी भाजपचे नेते व यवतमाळ जिल्हा समन्वयक नितिनजी भुतडा, जिल्हा परिषद मा. सभापती गजानन कांबळे, हिंगमिरे सर, भाजपा शहराध्यक्ष उमरखेड अतुल खंदारे, सचिन डोंगरे, संतोषजी चिंचोलकर,गोविंदजी बोखारे यांसह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
सोहळ्यासाठीची सर्व बांधकामे,व्यवस्थापन, कार्यक्रमाची रूपरेषा आणि भक्तांच्या सोयीसुविधांची बारकाईने पाहणी करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.महाकाली मंदिर परिसरात सध्या जोरदार तयारी सुरू असून प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी गावामध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
