महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा महागावच्या तालुका कार्यकारिणीची सभा २२ ऑगस्ट रोजी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर मोरझडे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.
या सभेत शिक्षक समितीच्या महागाव तालुका कार्यकारिणीची नवीन पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. दरम्यान
यावेळी अंकुश पाटील यांची तालुकाध्यक्षपदी, तर नितीन व्यवहारे यांची तालुका सचिवपदी निवड करण्यात आली असून सुनील वाघमोडे यांची कार्याध्यक्षपदी करण्यात आली.तसेच ओमकार तिवडकर यांची कोषाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा व मार्गदर्शन करण्यासाठी सरचिटणीस संजय काळे, राज्य कार्यकारिणी सदस्य संदीप मोहाडे यांच्यासह बुमना कासरेवार, अभिजीत नवलकर, पुंडलिक बुटले, सुनील हिंगमिरे, मोबीन हक, ज्ञानबा गुट्टे पाटील, पी. के. खंदारे, उच्च श्रेणी मुख्याध्यापक मोरे, मांडवकर, तुकाराम साठे, सचिन पवार, महेश बाजपेई, रामलाल जाधव, किशोर गादेकर, अर्चना भरकडे, शारदा दामधर, मंगेश बावणे, सुनील राठोड, उल्हास कुलकर्णी, आकाश आंबेकर, लक्ष्मण मुरकुटे, श्याम पांचाळ, बसवराज भद्रशेटे, दयानंद विभुते, नारायण सोनुले, मुख्याध्यापक बेदरकर, गुणवंत श्रीरामे आदी उपस्थित होते.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी माजी अध्यक्ष संभाजी निंबाळकर, माजी सचिव मेघराज सूर्यवंशी, दत्तात्रेय जंगमवाड, राहुल लंबे, शंकरराव नरवाड, श्याम पांचाळ, कपिल तडखेले यांच्यासह शाखा महागावच्या कार्यकारिणीने सहकार्य केले.
सभेचे सूत्रसंचालन सुरेश पांचाळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन मेघराज सूर्यवंशी यांनी केले. नूतन तालुका कार्यकारिणीचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन करून शिक्षकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.