येथील स्थानिक. मोहनलालजी पुरोहित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, महागाव येथे ८० वा प्रजासत्ताक दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य संगेवार सर होते.त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत आडे सर उपस्थित होते. तसेच पालक प्रतिनिधी म्हणून बंडू बेले,देवसरकर, कदम व राऊत यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत देशभक्तीपर गीते सादर केली. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवर प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. प्रमुख पाहुणे प्रशांत आडे सर तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य संगेवार सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत देशप्रेम, संविधानिक मूल्ये, शिस्त आणि जबाबदार नागरिकत्वाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देशपांडे मॅडम यांनी केले, तर प्राध्यापक ए. एन. पवार सर यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी प्राध्यापक गोरे सर, स्वामी सर, कु. मुनेश्वर मॅडम, कनिष्ठ लिपिक ए. पवार सर, प्रयोगशाळा सहाय्यक चव्हाण सर, कु. जाधव मॅडम यांच्यासह रामजीलालजी पुरोहित इंग्लिश मीडियम स्कूलच्या व्यवस्थापिका मालती भारती मॅडम, विद्या ठाकरे मॅडम, रेश्मा राणे मॅडम, सृष्टी नरवाडे मॅडम, मायाताई तसेच राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालयाचे प्रा. दानकारी सर, विशाल जाधव सर, संतोष जाधव सर, किशोर रागवते सर, शाळेचे शिपाई शंकरभाऊ दलशिंगारे, स्कूलबस चालक बाळू ससाने, गायकवाड भाऊ आदी मान्यवर उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसरात देशभक्तीचा आणि राष्ट्रप्रेमाचा उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.