अनुसूचित जातींच्या ‘अ-ब-क-ड’ उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी आज सोमवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता महागाव तालुक्यात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महागाव पंचायत समिती कार्यालयापासून या महामोर्चाला सुरुवात होणार असून, तहसील कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात तालुक्यातील विविध समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता आहे.
अनुसूचित जातींसाठी असलेल्या आरक्षणाच्या लाभांचे ‘अ-ब-क-ड’ अशा पद्धतीने वर्गीकरण केल्यास सामाजिक न्यायाच्या मूळ उद्देशावर परिणाम होण्याची शक्यता असल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी हा महामोर्चा काढण्यात येत आहे.
महामोर्चात तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला विरोध नोंदवावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. प्रा. शरदचंद्र डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
महागावमध्ये आज होणाऱ्या या महामोर्चाकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.