महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेला नवे नेतृत्व एकमताने निवड

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव : –

महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेची नव्याने गठीत झालेली कार्यकारिणी  निलेश नरवाडे यांच्या  मार्गदर्शनाखाली अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात घोषित करण्यात आली. पत्रकारितेच्या मूल्यांचा सन्मान राखत, तालुक्यात कार्यरत असलेल्या सर्व पत्रकार बांधवांनी एकमताने व्यक्त केलेल्या विश्वासाच्या बळावर ही कार्यकारिणी निवडण्यात आली असून,नव्या नेतृत्वाकडून अधिक गतिमान, प्रभावी व रचनात्मक कारभाराची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपद रजतकुमार खाडे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यांच्या शांत,संयमी व दूरदृष्टी असलेल्या कार्यशैलीमुळे पत्रकार संघटनेला अधिक बळकटी मिळेल,असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. संघटनेच्या विविध उपक्रमांना दिशा देणे, पत्रकारांच्या प्रश्नांवर योग्य पातळीवर आवाज उठवणे आणि तालुक्यातील पत्रकारितेची गुणवत्ता अधिक दृढ करणे,या सर्व बाबींची जबाबदारी अध्यक्ष म्हणून त्यांच्या खांद्यावर सोपविण्यात आली आहे.

उपाध्यक्ष म्हणून सदानंद जाधव यांची निवड झाली असून, संघटनेला संघटित ठेवत पत्रकारांच्या हिताचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी ते स्वतः पुढाकार घेणारे कार्यकर्ते असल्याची ओळख त्यांनी आधीच निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यतत्परतेचा संघटनेस निश्चितच फायदा होणार आहे.
तर श्रीकांत राऊत यांची सचिवपदी निवड एकमताने करण्यात आली.संघटनेतील सर्व कार्यवाही, बैठका, उपक्रम तसेच प्रशासकीय कामकाज नीटनेटके व गतिमान होण्यासाठी ते आपले कर्तव्य पार पाडतील,असा विश्वास सर्व सदस्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या अचूक समन्वयक भूमिकेमुळे संघटनेची कार्यपद्धती आणखी सक्षम होण्याची शक्यता आहे.

पत्रकार संघटना ही केवळ पदांची मांडणी नसून, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सत्य, निर्भय आणि वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्याची सामूहिक जबाबदारी असते.नव्याने निवडून आलेली ही कार्यकारिणी त्या जबाबदारीची जाण ठेवून काम करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.महागाव तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक, शैक्षणिक, जनजागृतीपर उपक्रम राबवून पत्रकारांनी आपल्या समाजशील भूमिकेची अनेकवेळा प्रचिती दिली आहे. आगामी काळातही हीच परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याचा निर्धार नव्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
निवड झालेल्या अध्यक्ष रजतकुमार खाडे, उपाध्यक्ष सदानंद जाधव आणि सचिव श्रीकांत राऊत यांचे सर्व स्तरातून हार्दिक अभिनंदन होत असून, त्यांच्या कार्यकाळात संघटना अधिक सक्षम, सबलीकृत आणि पत्रकार हितरक्षणाच्या दिशेने ठोस पावले उचलेल,अशी अपेक्षा व्यक्त केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या