स्ट्राँग रूम सुरक्षेवर प्रश्नचिन्ह ;  पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही,लाइव्ह डिस्प्लेची मागणी,ॲड.संतोष जैन यांचे निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन सादर

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

उमरखेड :

उमरखेड नगरपरिषद निवडणुकीसाठी २ डिसेंबर रोजी मतदान पार पडले असून निकाल जाहीर होण्यासाठी तब्बल १८ दिवसांचा कालावधी शिल्लक राहिल्याने स्ट्राँग रूम सुरक्षेचा विषय अत्यंत गंभीरतेने पुढे येत आहे.या संदर्भात उमरखेड जनशक्ती पार्टीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार तेजश्री जैन यांच्या वतीने निवडणूक प्रतिनिधी ॲड. संतोष जैन यांनी उपविभागीय अधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी सखाराम मुळे यांना सलग चार वेळा लेखी निवेदन देत सुरक्षाव्यवस्था अधिक बळकट करण्याची मागणी केली आहे.निवेदनात विशेषतःस्ट्राँग रूमच्या मागील व दोन्ही बाजूस सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे,सर्व कॅमेऱ्यांचे २४ तासांचे फुटेज उमेदवारांच्या प्रतिनिधींना उपलब्ध करणे,मुख्य प्रवेशद्वारासमोरील बॅरिकेट्सच्या बाहेर २४ तास दोन प्रतिनिधींना तैनात राहण्यास परवानगी, तसेच स्ट्राँग रूमच्या समोर मोठ्या स्क्रीनवर लाईव्ह मॉनिटरिंग डिस्प्ले सुरू ठेवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे.

 

ॲड.जैन यांनी स्पष्ट केले की – 

विवादांना वाव न देता,निवडणूक प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठीच या मागण्या केल्या आहेत.लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी स्ट्राँग रूम सुरक्षा शंकामुक्त असणे आवश्यक आहे.या, निवेदनांनंतर शहरात राजकीय चर्चांना उधाण आले असून सध्याची सुरक्षा व्यवस्थाच पुरेशी आहे का ? यावर नागरिक,तज्ञ व कार्यकर्त्यांमध्ये विविध तर्क,वितर्क सुरू झाले आहेत.

 

 

⬛ स्ट्राँग रूम परिसरात ‘जॉमर’ बसविण्याची स्वतंत्र मागणी

 

निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार किंवा नेटवर्कचा दुरुपयोग टाळण्यासाठी स्ट्राँग रूम असलेल्या नगरपरिषद परिसरात जॉमर बसविण्यात यावे,अशी स्वतंत्र लेखी मागणी उमेदवार शेख रसुल शेख वाहेद (प्रभाग क्र. १२) यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या