आज,प्रचाराचा अखेरचा दिवस,उद्या मतदान ; धनशक्ती पुढे जनशक्तीची स्थिती मजबूत,तेजश्री जैनची स्पष्ट बहुमतांकडे वाटचाल !

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड : –
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत प्रचाराचा आजचा अखेरचा दिवस अत्यंत तापलेला गेला असून, उद्याच्या मतदानापूर्वी जनशक्ती पॅनेलची स्थिती अधिक मजबूत झाली असून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ.तेजश्री संतोष जैन यांची स्पष्ट बहुमतांकडे वाटचाल सुरू असल्याचे राजकीय समीक्षकांचे निरीक्षण आहे.धनशक्तीपेक्षा जनशक्तीचाच प्रभाव या निवडणुकीत अधिक गडद झाल्याचे चित्र दिसत आहे.
प्रभागनिहाय प्रचार मोहिमा, संघटनाची बांधणी आणि मतदारांशी थेट संवाद यामुळे बहुमताचे गणित जनशक्तीकडे झुकत असल्याचे स्पष्ट होत आहे. तेजश्री जैन यांचा प्रचार शहरात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला असून, महिला व युवक मतदारांचा त्यांना व्यापक पाठिंबा मिळत असल्याचे असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.दरम्यान, सत्ताधारी गटासाठी ही निवडणूक अधिक कठीण ठरण्याची चिन्हे आहेत.काही प्रभागांमध्ये विरोधी पक्षांचे एकत्र येणे,स्थानिक पातळीवरील नाराजी, तसेच बदलत्या जनभावनेच्या पार्श्वभूमीवर पराभवाची सावली सत्ताधाऱ्यांवर दाट होताना दिसत आहे.
यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी पारंपरिक गटबंधने आणि सत्तेच्या प्रभावापेक्षा मुद्दे,आगामी काळात होणारा विशेष विकास आणि नेतृत्वाला प्राधान्य दिल्याचे चित्र उमटले आहे. शहरात परिवर्तनाची लाट अधिक वेगाने वाढत असून जनमतही बदलाच्या दिशेने झुकत असल्याचे दिसून येते.उद्याचे मतदान शहराच्या राजकीय भवितव्याचा निर्णायक क्षण ठरणार असून, २४ वर्षांपूर्वीचा इतिहास पुन्हा घडण्याची चिन्हे उमरखेडमध्ये उमटू लागली आहेत.अंतिम टप्प्यात विरोधक आणि जनशक्तीमध्ये चुरशीची लढत अधिक तीव्र होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

