काळी दौलत खानमध्ये बिबट्याचे साम्राज्य  शेतमजूर ,शेतकरी असुरक्षित, वनविभागावचा स..म्राट गप्प.. !

 

 

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

 

काळी दौलत खान परिसरातील मोहदी,सातघरी शिवारात काल दि. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी बिबट्याने शेतकऱ्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जण जखमी झाले असून त्यामध्ये महिलांचाही समावेश आहे. बबन मारोती धाडवे, प्रकाश नामदेव धाडवे, विद्याबाई धाडवे (मोहदी), तसेच अंकुश जाधव आणि लिलाबाई चव्हाण (सातघरी) अशी जखमींची नावे आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून या विभागात बिबट्याचा वावर वाढला असून शेतकरी व ग्रामस्थांनी पूर्वीही वनविभागाकडे तक्रारी केल्या होत्या.वनविभागाच्या कॅमेर्‍यांत बिबट्या कैद होऊनही वनविभागाने योग्य कारवाई न केल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.

मागील महिन्या भरापूर्वी पेवठाण येथे बिबट्याचा मृतदेह आढळला होता.सदर बाबतचा मृत्यू कशाने झाला याबाबत वनविभागाने वरिष्ठान कळविले की नाही ? सदर बिबट्याची परस्पर विल्हेवाट लावली असावी असा ग्रामस्थांनी संशय आहे.या भागात वन्यप्राण्यांचा सतत वावर असूनही वनविभागाकडून ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत.अशी जनभावना आहे.जखमी शेतकऱ्यांना यवतमाळ व सवना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सतत घडणाऱ्या हल्ल्यांनंतरही वनविभाग केवळ कागदी कारवाईपुरता मर्यादित आहे, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

 

वनपरिक्षेत्राधिकारी सम्राट मेश्राम यांनी हा हल्ला बिबट्याच्या पिलाने केला असावा अशी शक्यता व्यक्त केली आहे. तरीही पिंजरा उभारणे आणि इतर प्रतिबंधक उपाययोजना करण्यास विलंब होत असल्याची टीका होत असुन अशा निष्क्रिय वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याची येथून हकालपट्टी करण्यात यावी या मागणीने जोर धरला आहे.

——————————————————————————-

शेतकरी, महिला आणि बालकांना सतत धोका निर्माण झाल्याने ग्रामस्थांत तीव्र संताप निर्माण झाला आहे. या संदर्भात तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शिवसेना (शिंदे) युवासेनेचे उपजिल्हा सचिव लखन राठोड यांनी केली असून मागणी पूर्ण करण्यास वनविभागाने विलंब केल्यास वनविभागाच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही लोकवेध न्यूज पोर्टलशी भ्रमणध्वनी वरून बोलताना दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या