महागाव तालुक्यातील उटी येथील प्रयोगशील शेतकरी विनोद मैंद यांना राज्याचा प्रतिष्ठेचा ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर झाल्याबद्दल त्यांचा उत्साहपूर्ण महागाव कृषी कार्यालयात सत्कार करण्यात आला.शेती क्षेत्रात सातत्याने नवनवीन प्रयोग करून इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी कार्य करणाऱ्या विनोद मैंद यांच्या यशाबद्दल उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी विनोद मैंद यांच्या कार्याचा गौरव करत सांगितले की,आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर,पीक पद्धतीतील बदल आणि मेहनतीच्या जोरावर त्यांनी शेतीत वेगळी ओळख निर्माण केली आहे.अशा प्रयोगशील शेतकऱ्यांमुळे इतर शेतकऱ्यांनाही नवे मार्गदर्शन मिळत असून शेती क्षेत्र अधिक सक्षम होत आहे.
सत्कार समारंभात शेतकरी आत्माराम पाटील गावंडे, मनोज गावंडे,विनायक
गावंडे,कैलास पाटील वानखेडे, रविभाऊ संघई, विनायक सोनुले, प्रशांत पाटील राऊत,संतोष पाटील गावंडे, सुरेश वानखेडे,तसेच गजानन गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
उपस्थित मान्यवरांनी विनोद मैंद यांना पुढील काळातही शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग करून अधिकाधिक शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे आवाहन केले. त्यांच्या या यशामुळे संपूर्ण महागाव तालुका परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून,मेहनत,जिद्द आणि आधुनिक विचारांच्या बळावर शेतीतही मोठे यश मिळविता येते,याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे.दरम्यान
तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (आत्मा)
अविनाश वाघमारे यांनीही विनोद मैंद यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.