नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीजच्या १९ व्या गळीत हंगामाचा आज शुभारंभ कृषिरत्न बी. बी. ठोंबरे यांच्या अध्यक्षतेखाली गळीत हंगामाचा शुभारंभ

लोकवेध न्यूज नेटवर्क /०६ ऑक्टोंबर.
महागाव :-

नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लि., युनिट क्र. २, गुंजसदना, ता. महागाव, जि. यवतमाळ यांच्या सन २०२६-२७ च्या १९ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता कारखाना परिसरात करण्यात येणार आहे.मागील गळीत हंगामात सर्वाधिक ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादक शेतकरी सी. मिनाताई गिरीश अग्रवाल, रा. शेळू बु., ता. पुसद, जि. यवतमाळ यांच्या शुभहस्ते या गळीत हंगामाचा शुभारंभ होणार आहे.

या कार्यक्रमास मा. कृषिरत्न श्री. बी. बी. ठोंबरे, चेअरमन व कार्यकारी संचालक, नॅचरल उद्योग समूह यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून यावेळी कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी, संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार तसेच परिसरातील मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे. नवीन गळीत हंगामाच्या प्रारंभामुळे परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकरी, कामगार आणि कारखाना प्रशासन यांच्या समन्वयातून यंदाचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला असून, कारखान्याच्या प्रगतीसोबतच ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला आहे.
नॅचरल शुगरच्या १९ व्या गळीत हंगामास सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या