पन्नास टक्के अनुदानावर बी-बियाणे; शेतकऱ्यांनी तातडीने ऑनलाइन अर्ज करा ; तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांचे आवाहन
लोकवेध न्यूज नेटवर्क / १८ में.
महागाव : –
खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या वतीने शेतकऱ्यांना प्रमाणित बी-बियाणे खरेदीसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येत असून,या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले यांनी केले आहे.खरीप पेरणी व लागवडीसाठी सोयाबीन,मूग, तूर आदी पिकांच्या प्रमाणित बियाण्यांवर शासनाने अनुदान योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदीवर ५० टक्के अनुदान मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह प्रक्रिया पूर्ण करावी. शासनमान्य व प्रमाणित बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होणार असून, शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही अंकुश टकले यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल, लोकवेध न्यूजशी बोलतांना सांगितले.
कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात येत असून, अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक किंवा तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

