विशेष मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाची झळाळी; बुटीबोरीत उन्हाळी निवासी शिबिर उत्साहात

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०७ मे.

बुटीबोरी / नागपूर

संज्ञा संवर्धन संस्था संचालित कल्पतरू विशेष मुलांची शाळा येथे विशेष मुला-मुलींसाठी आयोजित करण्यात आलेले उन्हाळी निवासी शिबिर सध्या उत्साहपूर्ण वातावरणात सुरू आहे. दिनांक ४ मे २०२६ पासून सुरू झालेल्या या शिबिराचा समारोप ९ मे २०२६ रोजी होणार आहे.

या निवासी शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शैक्षणिक मार्गदर्शनासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा, कला-कौशल्य विकास आणि जीवनोपयोगी कौशल्यांवर विशेष भर दिला जात आहे.शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, आत्मविश्वास आणि सामाजिक जाणीवा विकसित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आनंदी, सुरक्षित आणि सकारात्मक वातावरणात मुलांचे व्यक्तिमत्त्व खुलत असून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद शिबिराच्या यशाची साक्ष देत आहे.

या उपक्रमासाठी संस्थेचे सचिव डॉ. राजेश्वर उत्तरवार यांचे मार्गदर्शन लाभत असून शिक्षक व कर्मचारी यांच्या समर्पित प्रयत्नांमुळे शिबिर यशस्वीपणे पार पडत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या