सवनाची अवनी चमकली; राष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल जिल्हास्तरावर भव्य सत्कार

 

लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

यवतमाळ | प्रतिनिधी

 

महागाव तालुक्यातील सवना येथील कु. अवनी हिने राष्ट्रीय स्तरावर केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्याचा अभिमान उंचावला आहे. भारत सरकारच्या वतीने पंजाबमधील चंदीगड येथे २५ व २६ मार्च २०२६ रोजी आयोजित राष्ट्रीय ज्युनियर व सब-ज्युनियर टेबल टेनिस स्पर्धेत अवनीने सिल्व्हर मेडल पटकावले.

या यशाबद्दल १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड,जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या हस्ते अवनीचा सत्कार करण्यात आला.उपस्थित मान्यवरांनी अवनीच्या कामगिरीचे मनापासून कौतुक करत तिच्या यशाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरवले.ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील क्रीडा क्षेत्रात मोठी झेप घेऊ शकतात, हे अवनीने सिद्ध केले आहे, असे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले.

 

अवनीच्या या यशामागे श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय, सवना येथील चेअरमन सुभाषराव देशमुख सवनेकर, प्राचार्या माया राउत तसेच खेळ आणि अभ्यास यांचा समतोल साधण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या वर्गशिक्षिका श्रद्धा देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.तसेच श्री शिवाजी शिक्षण संस्था, पुसदचे माजी अध्यक्ष विजयराव पाटील चोंडीकर, अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंडीकर,सचिव अश्विनीताई पाटील चोंडीकर आणि संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचेही या यशात मोठे योगदान असल्याचे नमूद करण्यात आले.अवनीच्या या यशामुळे यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्र राज्याचा मान उंचावला असून,तिच्यावर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या