रेती घाटावर तणावाचा स्फोट : ‘खंडणीसाठी रिव्हॉल्वर’चा आरोप, पोलिसांचा ठाम इन्कार”

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल

 

उमरखेड :-

 

हदगाव–उमरखेड तालुक्यातील चातारी/दिघी रेती घाट प्रकरणाने अचानक नाट्यमय वळण घेतले असून आरोप-प्रत्यारोपांमुळे परिसरातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. उमरखेड येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक २ एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी शरद लोहकरे पोलिस यांनी थेट खंडणी मागण्याचा गंभीर आरोप केला.

 

पाटील यांनी स्पष्ट केले की, संबंधित रेती घाट लिलाव प्रक्रियेनुसार कायदेशीररित्या घेतला असून सर्व उत्खनन नियमांनुसार सुरू आहे. “अशा परिस्थितीत पोलिसांकडून पैशांची मागणी होणे चुकीचे आहे.मी खासदार पुत्र असल्यामुळे जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे,असा आरोप त्यांनी केला.

दिघी रेती घाट मराठवाडा हद्दीत येतो आणि आम्ही आमच्या कार्यक्षेत्रात काम करत असताना हा प्रकार घडल्याचे त्यांनी नमूद केले. याचवेळी त्यांनी एलसीबीचे पीएसआय शरद लोहकरे यांच्यावर थेट आरोप करत, रेती उपसा करणाऱ्या माझ्या मजूर कार्यकर्त्याच्या कानाला रिव्हॉल्वर लावून खंडणी मागण्यात आली,असा गंभीर दावा केला. या घटनेदरम्यान निर्माण झालेल्या गोंधळात त्यांच्या वाहनाची काच फोडण्यात आल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत बोलतांना सांगितले.यावेळी ॲड.बळीराम मुटकुळे, अजय नरवाडे,गजेंद्र ठाकरे,नितीन शिंदे यांची उपस्थिती होती.

दरम्यान, या संदर्भात पोलिसांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार,उमरखेड पोलीस ठाण्यात नोंद करूनच पथक कारवाईसाठी रवाना झाले होते आणि त्यांच्यासोबत एसडीएम कार्यालयाचे अधिकारीही उपस्थित होते. मात्र घटनास्थळी पोहोचताच रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर नांदेडच्या दिशेने निघून गेल्यामुळे पुढील कारवाई होऊ शकली नाही. कोणालाही पिस्तूल दाखवले नाही किंवा पैशांची मागणी करण्यात आलेली नाही,असा ठाम खुलासा पीएसआय शरद लोहकरे यांनी केला.

या ,प्रकरणात दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी दावे केल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून वाद अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सत्य समोर यावे यासाठी निष्पक्ष चौकशीची मागणी आता जोर धरत आहे.

 

हिमायतनगर पोलिसात तक्रार दाखल

या प्रकरणी कृष्णा वानखेडे व गणेश घारपळकर यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या या प्रकरणात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती कृष्णा पाटील यांनी दिली.असून या प्रकरणात मी,माझ्या वकिलाचा सल्ला घेऊन पुढील दिशा ठरवणार आहोत असे पुढे बोलतांना म्हणाले.एकूणच, रेती घाटावरील हा वाद आता केवळ स्थानिक मुद्दा न राहता राजकीय आणि प्रशासकीय संघर्षात रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या