वेदांत–साकेतच्या प्रतिभेची झळाळी; विशेष मुलांच्या सामर्थ्याला सलाम करत सीआरसी नागपूरमध्ये ऑटिझम जागरूकता दिन उत्साहात 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २ एप्रिल

 

नागपूर, बुटीबोरी :-

 

जागतिक ऑटिझम जागरूकता दिनानिमित्त सीआरसी नागपूर येथे विविध उपक्रमांनी भरलेला प्रेरणादायी कार्यक्रम उत्साहात पार पडला. कल्पतरू विशेष शाळेतील ऑटिझम असलेल्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपल्या कलागुणांची प्रभावी झलक सादर केली.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून इंदिरा गांधी हॉस्पिटल, नागपूर येथील डॉ. सोमाणी उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांच्या कौशल्याचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडतो, असे प्रतिपादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या हस्तनिर्मित वस्तूंचा आकर्षक स्टॉल उभारण्यात आला होता.बुके,फाईल्स, पणत्या,योगा मॅट आदी साहित्याचे प्रदर्शन व विक्री करण्यात आली. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे मनापासून कौतुक करत त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमात विशेष शिक्षक रविंद्र देशमुख व सौ. अर्चना अडगे यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विद्यार्थी वेदांत दासगुप्ता आणि साकेत चौबे यांनी आपल्या उत्कृष्ट सादरीकरणातून उपस्थितांची मने जिंकली.

या उपक्रमातून ऑटिझम असलेल्या मुलांमधील सुप्त गुणांना वाव देत त्यांच्या स्वावलंबनाला बळकटी देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न करण्यात आला.तसेच समाजात ऑटिझमविषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या