टोल आंदोलनात पोलीसांची उर्मट वागणूक; पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या त्या ” पोलिस अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी

लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ मार्च

महागाव :

दारव्हा तालुक्यातील कारंजा येथील टोल नाक्यावर आंदोलन सुरू असताना एका पोलीस अधिकाऱ्याने पत्रकाराशी धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

२३ मार्च रोजी भुलाई टोल प्लाझा (राष्ट्रीय महामार्ग ३६१-सी) बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे आंदोलन सुरू होते. या आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी अनेक पत्रकार घटनास्थळी आले होते. पोलिसांनी दारव्हा येथे बॅरिकेड्स लावून काही काळ रस्ता बंद केला होता. ओळखपत्र तपासून पत्रकारांना पुढे जाण्याची परवानगीही देण्यात आली होती.

मात्र, त्याच वेळी कर्तव्यावर असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज दाभाडे यांनी अचानक आक्रमक भूमिका घेत काही पत्रकार व नागरिकांना हाकलण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. ‘दैनिक लोकसूत्र’चे कार्यकारी संपादक केशव सवळकर हे बातमीसाठी गेले असताना त्यांच्या सोबत धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांच्याशी उर्मटपणे बोलण्यात आले. त्यांनी ओळखपत्र दाखवूनही त्यांना योग्य वागणूक देण्यात आली नाही,असे सांगण्यात आले. दरम्यान या घटनेमुळे पत्रकारांमध्ये त्या.. पोलिस अधिकाऱ्याबद्दल नाराजी पसरली आहे.पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असताना पोलिस अधिकाऱ्यांकडून अशी ही, असभ्यतेची वागणूक त्या, पोलिस अधिकाऱ्याला अशोभनीय असल्याची जनभावना आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, ही मागणी कायम आहे.

महागाव तालुका पत्रकार महासंघाने या प्रकरणी तहसीलदार अभय मस्के यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कडक कारवाई करून त्यांना सेवेतून काढून टाकावे, अशी मागणी करण्यात आली आहे.निवेदन देताना पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, मार्गदर्शक संजय भगत, गजानन वाघमारे, विनोद कोपरकर, अमोल राजवाडे, नंदकुमार कावळे, निलेश पाटील नरवाडे, डॉ. गजानन वैद्य, धम्मानंद कावळे, रियाज पारेख, राज पाटील नरवाडे, मनोज सुरोशे, बाळुभाऊ राठोड, अजय पाचंगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या