वादग्रस्त अधिकाऱ्यांचे पुनरागमन; रेती माफिया प्रकरणानंतरही महागाव ठाण्यात पुन्हा रुजू!”
लोकवेध न्यूज नेटवर्क / २३ मार्च
महागाव :-
वाकोडी येथील गाजलेल्या रेती माफिया हल्ला प्रकरणानंतर चर्चेत आलेले सपोनी पुन्हा एकदा महागाव पोलीस ठाण्यात आपल्या कर्तव्यावर रुजू झाल्याने जिल्हा पोलीस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिनांक ७ मार्च रोजी त्यांची पुनर्रजूती झाल्याची माहिती समोर येताच नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
गुन्हेगारी क्षेत्रातील माफियांना अभय देणे, तसेच त्यांच्याशी अर्थपूर्ण संबंध असल्याचे आरोप असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा त्याच ठिकाणी संधी देण्यात आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर शंका उपस्थित होत आहे. वाकोडी येथील रेती माफिया हल्ला प्रकरण अद्याप नागरिकांच्या स्मरणात ताजे असताना, अशा अधिकाऱ्यांचे पुनरागमन ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.
महागावसारख्या संवेदनशील ठाण्यात वादग्रस्त अधिकाऱ्यांची नियुक्ती केल्याने कायदा व सुव्यवस्थेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढीस लागली असून, जिल्हा पोलीस प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, या निर्णयामागील कारणे स्पष्ट करण्याची मागणी नागरिकांकडून होत असून, संबंधित अधिकाऱ्यांवर निष्पक्ष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचीही मागणी जोर धरत आहे.
———————————————————————-
सदर, पोलिस अधिकाऱ्यांनी त्या, घटने दरम्यान ठाण्यात आपली रवानगी टाकली नवहती,तसेच कर्तव्यावर असल्याचे त्याचं कुठलेच वर्तणूक दिसून आले नसून पोलिस प्रशासनाची खाकी वर्दी त्यांनी यावेळी परिधान केली नाही.हप्ता वसुलीत झालेली दुर्घटना जिल्हा पोलिस प्रशासनाने अगदी नजर अंदाज केल्याचं या प्रकारावरून दिसून येत.अशा वादग्रस्त अधिकाऱ्यास पुन्हा महागाव पोलिस ठाण्यात कर्तव्यावर रुजू केल्याने जिल्हा पोलिस प्रशासनावर प्रश्न उपस्थित होत आहेत. दस्तुरखुद जिल्ह पोलिस अधीक्षकांनी सदर अधिकाऱ्यांना चांगलीच तंबी दिली होती.आपण रवानगी टाकली नाही,महसूल विभागाचं काम कार्यवाही करणं अपेक्षित असताना आम्हाला पोलिसांना यात काही देणंघेणं नाही.सदर अधिकारी यात दोषी असून त्यांना अशा कार्यवासाठी जाण्यास कोण्ही सांगतले.असा उलट जाब सुद्धा विचारला होता.एवढ्या गंभीर प्रकरणात पुन्हा महागाव येथे पुन्हा पाठवणे म्हणजे सौ,चुव्हे ” खाके ..बिल्ली, हज को” चली…असे म्हटल्यास वावगे ठरू नये..
