सामाजिक कार्याचा उत्सव; घनश्याम भाऊ नांदुरकर यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा”

 

 

 

 

 

 

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / २४ मार्च 

नागपूर प्रतिनिधी : – 

 

दिनांक २३ मार्च २०२६, सोमवार रोजी सामाजिक कार्यकर्ते तथा सर्वसामान्यांच्या मनातील “राजा माणूस” म्हणून ओळखले जाणारे घनश्याम भाऊ नांदुरकर यांचा वाढदिवस ज्ञानचंद्रिका नगर, बहादुरा येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. विशेष म्हणजे, नागरिकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आकर्षक मूर्ती भेट देऊन त्यांच्या कार्याबद्दल आदर व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी उपस्थित नागरिकांनी नांदुरकर यांच्या सामाजिक कार्याचे मनापासून कौतुक करत,त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांच्या कार्यामुळे परिसरात सकारात्मक बदल घडत असून, समाजासाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या