विशेष मुलांचा आत्मविश्वास झळकला; ‘सांस्कृतिक धरोहर’ कार्यक्रमात संस्कृतीचा सुंदर आविष्कार”

लोकवेध न्युज नेटवर्क / २३ मार्च 

 

बुटीबोरी, नागपूर :- 

 

संवर्धिनी न्यास – सांस्कृतिक धरोहर यांच्या वतीने आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. भारतीय संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदना या समूह नृत्याने झाली. कल्पतरू विशेष शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या या नृत्याने उपस्थितांची मने जिंकली. विशेष मुलांनी आत्मविश्वासाने आणि आनंदाने सादरीकरण करत आपल्या कलेची छाप पाडली.

यानंतर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. नृत्य, गीते आणि इतर कलाप्रकारांमधून भारतीय परंपरा, संस्कृती आणि संस्कारांचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले. उपस्थित प्रेक्षकांनी या सादरीकरणांना भरभरून प्रतिसाद दिला.

या कार्यक्रमातून विशेष मुलांमध्ये दडलेल्या गुणांना व्यासपीठ मिळाले तसेच त्यांच्या आत्मविश्वासाला चालना मिळाली. समाजात संस्कृती जपण्याची गरज आणि नव्या पिढीमध्ये चांगले संस्कार रुजवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या