महाशिवपुराण कथेला आमदारांची भेट; १३ लाखांच्या निधीची घोषणा, अंबाळीत आनंदाचा जल्लोष !

लोकवेध न्यूज नेटवर्क / २२ मार्च 

विनोद यादवकुळे 

अंबाळी :- 

 

अंबाळी येथे सुरू असलेल्या महाशिवपुराण कथा सोहळ्याला आज विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुरू झालेल्या या भक्तीमय कार्यक्रमात गावकरी व भाविक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.

यावेळी उमरखेड महागाव विधानसभा क्षेत्राचे आमदार किसनराव वानखेडे यांनी महादेव मंदिर परिसराला भेट देत उपस्थित भक्तांशी संवाद साधला. त्यांच्या भेटीमुळे कार्यक्रमात आणखी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

याच प्रसंगी त्यांनी महादेव मंदिराच्या सभा मंडपासाठी तब्बल १३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली.या घोषणेमुळे गावकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मंदिराच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

तसेच या कार्यक्रमाला गजाननराव वानखेडे, प्रेमानंद पाटील, सुभाष जाधव, चंदू पाटील आणि गणेशराव कदम यांनीही उपस्थित राहून महाशिवपुराण कथेला भेट दिली.

संपूर्ण सोहळा भक्तीमय वातावरणात पार पडत असून गावात धार्मिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या