बीजोरा टोल नाक्यावर भीषण अपघात; मद्यधुंद ट्रकचालकाचा कहर ७ ते ९ जण जखमी

लोकवेध न्युज नेटवर्क / १८ मार्च
महागाव :-
उमरखेडवरून महागावकडे येत असताना बीजोरा टोल नाक्याजवळ एका मद्यधुंद ट्रकचालकाने मालवाहू आयचर,ऑटो आणि मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याची गंभीर घटना घडली.या भीषण अपघातात सुमारे ७ ते ९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करत जखमींना उमरखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. जखमींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या संदर्भात ठाणेदार धनराज निळे यांनी सांगितले की, अपघातानंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली.
दरम्यान,वृत्त लिहेपर्यंत या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या