“अज्ञात कॉलचा सापळा, फुलसावंगीतील व्यावसायिकाचा मानसिक छळ; पोलिसांत तक्रार
लोकवेध न्युज नेटवर्क / १८ मार्च
महागाव :-
तालुक्यातील फुलसावंगी येथील एका प्रतिष्ठित दुकानदाराला अज्ञात मोबाईल क्रमांकावरून वारंवार फोन करून भेटीसाठी दबाव टाकत मानसिक छळ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.या प्रकरणी संबंधित व्यावसायिकाने महागाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली असून,आरोपी महिलेवर कडक कारवाईची मागणी केली आहे.
विवेक लक्ष्मण शेळके (वय ५०, रा. फुलसावंगी) हे गावात जेन्ट्स हेअर सलून चालवतात. गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांना ८२०८६५८०१२ या मोबाईल क्रमांकावरून सतत फोन येत आहेत.फोनवरील अज्ञात महिला त्यांना वारंवार मला तुम्हाला भेटायचे आहे.मी, सांगेल तिथे या किंवा दुकानाबाहेर या,असे सांगत दबाव आणत आहे.
विशेष म्हणजे,वारंवार विचारणा करूनही संबंधित महिला आपली ओळख उघड करत नसून नाव सांगण्यास टाळाटाळ करत आहे.या प्रकारामुळे शेळके मानसिक तणावाखाली आले असून,समाजात बदनामी होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.मी, एक प्रतिष्ठित नागरिक असून या अज्ञात फोनमुळे मला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.दरम्यान,महागाव पोलिसांनी संबंधित मोबाईल क्रमांकाच्या आधारे अज्ञात महिलेचा शोध सुरू केला असून, प्रकरणाचा पुढील तपास तपास सुरू आहे.
