आयुष्यमान कार्डसाठी निघालेल्या वृद्धेचा दुर्दैवी अंत; अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू

लोकवेध न्यूज नेटवर्क / १३ मार्च

महागाव : – 

आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी पायदळ निघालेल्या ७० वर्षीय वृद्ध महिलेचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना महागाव–कलगाव मार्गावरील पूस नदी पुलानजीक घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

श्रीमती सोमाबाई राघोजी वंजारे (वय ७०) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या कलगाव येथून महागावकडे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी पायदळ येत होत्या. काल दिनांक ११ मार्च रोजी सकाळी सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास पूस नदीच्या पुलावर विरुद्ध दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की त्या जागीच ठार झाल्या,असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

 

दरम्यान या प्रकरणी नारायण अंबाजी भांडवले यांच्या फिर्यादीवरून महागाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १४९,२८१ व १०६ अन्वये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा पुढील तपास महागाव पोलीस ठाण्याचे जमादार नेवकर करीत असून अज्ञात वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या