बूटीबोरीतील कल्पतरू विशेष शाळेत होळी उत्साहात साजरी

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०४ : मार्च 

नागपूर:- 

संज्ञा संवर्धन संस्था द्वारा संचालित कल्पतरू विशेष शाळा येथे दिनांक २ मार्च २०२६ रोजी दरवर्षीप्रमाणे होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा कार्यक्रम अत्यंत आनंददायी वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात मुलांना होळी सणाचे महत्त्व समजावून सांगून करण्यात आली. विशेष शिक्षिका सौ. पूनम चौरागडे यांनी होळी सणाची माहिती विद्यार्थ्यांना सोप्या भाषेत दिली. त्यानंतर विधिवत पूजन करण्यात आले व संस्थेचे सचिव डॉ. आर. एम. उत्तरवार यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आली.

यानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना गुलाल लावून आनंदात होळी साजरी केली. शिक्षक व कर्मचारी यांनीही मुलांसोबत गुलाल उधळत सणाचा आनंद द्विगुणित केला. होळीच्या गाण्यांवर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी सामूहिक नृत्य सादर केले. मुलांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर आनंदमय झाला.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच शाळा समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत होळीचा सण आनंदात साजरा केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या