मातोश्री विद्यालयाचा एनएमएमएसमध्ये झळाळता यश; आठ विद्यार्थी प्रज्ञावंत

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क / २६ फेब्रुवारी
महागाव:-
महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध (NMMS) परीक्षेत मातोश्री माध्यमिक विद्यालयाने यंदा उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी उज्वल कामगिरी करत प्रज्ञावंत म्हणून आपले स्थान निश्चित केले.
या परीक्षेत सिद्धी देशमुख, श्रीतेज राठोड, प्रणव राठोड, केतकी केदार, सृष्टी चौरे, जनार्दन येनकर, अजिंक्य आडे आणि श्रुती जाधव या विद्यार्थ्यांनी यश संपादन करत विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थापक दिगंबर जगताप यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य, शिक्षकवृंद, कर्मचारी आणि पालकांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या पुढील प्रगतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
विद्यालयाच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून मातोश्री विद्यालयाने गुणवत्तापूर्ण शिक्षणाची परंपरा पुन्हा अधोरेखित केली आहे.
