भुकेचा केंद्रबिंदू सलग सहा पुरस्काराने सन्मानित, गझलकार गजानन वाघमारे यांच्या गझल संग्रहाला सर्वाधिक पसंती

ज्ञानेश्वर ठाकरे :
लोकवेध न्यूज नेटवर्क २४ फेब्रुवारी
महागाव :
विदर्भातील पत्रकार व मराठी ग़ज़लकार गजानन वाघमारे यांच्या ‘भुकेचा केंद्रबिंदू’ या ग़ज़ल संग्रहाला आणखी एक राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला आहे.डोंबिवली येथील काव्यरसिक मंडळतर्फे दिला जाणारा कै. अनिल साठे स्मृती सर्वोत्कृष्ट ग़ज़लसंग्रह पुरस्कार २०२६ या संग्रहाला मिळणार असून १ मार्च रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय हीरक महोत्सवात पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
अल्पावधीत या संग्रहाला मिळालेला हा सलग सहावा राज्यस्तरीय सन्मान ठरला आहे. यापूर्वी स्व. व्यंकटराव देशमुख स्मृती ग़ज़ल गुंफन पुरस्कार, बापुरावजी पेटकर राज्यस्तरीय ग़ज़ल पुरस्कार (शेगाव बुद्रुक), संवेदना सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार (हिमायतनगर), साहित्य विहार संस्था नागपूरचा सर्वोत्कृष्ट ग़ज़ल संग्रह पुरस्कार आणि आशादीप राज्यस्तरीय नामदेव ढसाळ उत्तेजनार्थ पुरस्कार असे मानाचे पुरस्कार या संग्रहाला मिळाले आहेत.
‘भुकेचा केंद्रबिंदू’ या संग्रहात शंभर ग़ज़लांचा समावेश आहे. भूक, बेरोजगारी, गरीबी, जातीय विद्वेष, धार्मिक कट्टरता, अंधश्रद्धा आणि शेतकरी आत्महत्या यांसारख्या सामाजिक विषयांवर प्रभावी भाष्य या ग़ज़लांमधून केले आहे.वास्तवाचे थेट आणि संवेदनशील चित्रण ही या संग्रहाची खासियत मानली जात आहे.
सलग सहा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्यामुळे गजानन वाघमारे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून विदर्भाच्या साहित्य क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब मानली जात आहे. ग़ज़लेच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा हा संग्रह राज्यभर चर्चेत अल्पावधीत भुकेचा केंद्रबिंदू या गजल संग्रहाने कमालीचा उच्चांक गाठला आणून ही बाब महागावकरांसाठी अभिनंदनीयन आहे.
