पिंपळेश्वर देवस्थानी शिवजन्मोत्सवाचा भव्य सोहळा; युवा शाहीर यशवंतदादा जाधव यांच्या पोवाड्यांनी रंगणार शिवमय वातावरण

लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :- 

सालाबादाप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाचा भव्य महोत्सव शनिवार दि. २१ फेब्रुवारी २०२६ रोजी पिंपळेश्वर देवस्थान येथे उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शिवजन्मोत्सव समिती, फुलसावंगी यांच्या वतीने आयोजित या सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी,असे आवाहन करण्यात आले आहे.
या वेळी शिवप्रतिमेची विधिवत प्रतिष्ठापना करून शिवरायांची महाआरती करण्यात येणार असून संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे.त्यानंतर युवा शाहीर यशवंतदादा जाधव यांचा दमदार पोवाड्यांचा कार्यक्रम सायं. ७.०० वाजता रंगणार असून त्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणातून शिवचरित्राचा पराक्रम, स्वराज्याची गाथा आणि मराठ्यांचा अभिमान जागवला जाणार आहे.
शिवभक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदवी स्वराज्याच्या या प्रेरणादायी सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती, फुलसावंगी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या