चिमुकल्यांनी नृत्याच्या माध्यमातून सांगितले मोबाईलचे दुष्परिणाम, स्व.मोहनलालजी कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात स्नेहसंमेलनाचे आयोजन

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

महागाव :- 

 

 स्व.मोहनलालजी पुरोहित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात घे भरारी स्नेह संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रामलालजी पुरोहित इंग्लिश मिडीयम स्कूल मधील केजी २ मधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी मानवी जीवनात मोबाईल जितका चांगला तेवढ्या मोठ्याप्रमाणात त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्या नृत्याविष्कारातून दाखवित उपस्थितांची मने जिंकुन घेतली.

महागाव येथील स्व.मोहनलालजी पुरोहित यांना कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात घे भरारी वार्षिक स्नेह संमेलनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या स्नेह संमेलनाचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष अभय मस्के (तहसीलदार महागाव)प्रमुख अतिथी ठाणेदार धनराज निळे,नगराध्यक्षा सौ.सुनंदा दिलीपराव कोपरकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून करण्यात आले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष रितेश पुरोहित,उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे,बाजार समितीचे सभापती रविंद्र पवार,बाजार समितीचे संचालक किशोर देशमुख,विनोद पाटील राऊत,नगरसेवक शैलेश कोपरकर,सुजित ठाकुर,भाजप शहराध्यक्ष निलेश नरवाडे,माजी उपनगराध्यक्ष सुरेश पाटील नरवाडे,देवानंद पाटील दुपात्रे,शिवसेना उबाठा विधानसभा प्रमुख भिमराव भालेराव,महागाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश कामारकर,पत्रकार विशाल डहाळे ,शेरखान पठाण,गोपी चक्करवार,संजय अमिलकंठवार यांच्यासह पालक उपस्थित होते.आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगती साध्य केली असुन सद्या मोबाईलचे युग असल्याने आज जग फार जवळ आले.अनेक कामे मोबाईलमुळे सुसह्य झालीत त्याच बरोबर मोबाईल मानवी जीवनाचा अविभाज्य घटका बनला खरा परंतु याच बरोबर या मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा मानवी जीवनात प्रकर्षाने जाणवु लागल्याने यावर वास्तव मांडणाऱ्या गीतावर रामलाल पुरोहित इंग्लिश मिडीयम स्कूलमधील मधील रियांशु धवसे,मोहन दलसिंगारे,सार्थक नरवाडे,अथर्व मिरासे, जैनाब पठाण,शर्वरी भंडारे, आराध्या पायघन, सान्वी राठोड या चिमुकल्यांनी बहारदार नृत्य सादर करीत उपस्थितांची मने जिंकुन घेतली.या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. जी. एस.स्वामी, प्रा.अनुप पवार,प्रा. वर्षा देशपांडे,प्रा. ए. टी. मुनेश्वर मॅडम, प्रयोगशाळ सहाय्यक अमितकुमार चव्हाण,शीतल जाधव, अजेश पवार,इंग्लिश मिडीयम स्कूलच्या व्यवस्थापिका मालती भारती मॅडम,प्राचार्य विद्या ठाकरे,शिक्षिका रेश्मा राणे,वर्षा बर्डे,सृष्टी नरवाडे,प्रणिता दलशिंगारे,शंकर दलशिंगारे, बाळु ससाणे,गायकवाड यांनी परिश्रम घेतले.या कार्यक्रमाचे संचालन प्राचार्य दिपक संगेवार यांनी केले तर आभार प्रा.गोरे सर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या