बिटरगाव पोलिसांचे ‘दंगल नियंत्रण’ प्रात्यक्षिक; नागरिकांमध्ये कुतूहल

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी बिटरगाव पोलीस स्टेशनच्या वतीने शहरात विशेष ‘दंगल नियंत्रण’ प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.ठाणेदार पांडुरंग शिंदे आणि पोलीस उपनिरीक्षक सागर अन्नमावर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रात्यक्षिक पार पडले. शहरातील गजबजलेले ठिकाण असलेले छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नवीन बस स्टँड यासह इतर प्रमुख चौकांमध्ये पोलिसांनी आपली रणनीती सादर केली.यावेळी रवी गीते,मोहन चाटे,रोशन सरनाईक,संतोष चव्हाण,सुदर्शन जाधव, शरद चव्हाण,शिवाजी अंबाडे,शिवाजी शिंदे, यासाह इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा ताफा तैनात होता.भरचौकात अचानक सुरू झालेल्या या पोलीस हालचालींमुळे नेमके काय घडले, याबाबत नागरिकांमध्ये सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हे एक सरावाचे प्रात्यक्षिक असल्याचे समजताच नागरिकांनी ते कुतूहलाने पाहिले. कोणत्याही अनुचित प्रकाराला तोंड देण्यासाठी पोलीस दल सदैव सज्ज आहे, हा संदेश या माध्यमातून देण्यात आला.
