जे.एस.पी.एम. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये वार्षिक आनंद मेळा उत्साहात संपन्न

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जे.एस.पी.एम. उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, महागाव येथे वार्षिक आनंद मेळा अतिशय उत्साहपूर्ण व आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवणे तसेच शालेय जीवनात आनंददायी अनुभव निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
या आनंद मेळ्याचे उद्घाटन सहाय्यक शिक्षक अब्दुल सलीम व बाबर लाला यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम शाळेचे मुख्याध्यापक अब्दुल समद यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमास शाळेतील सहाय्यक शिक्षक अब्दुल सलीम, मोहम्मद मुसद्दीक, सय्यद वसीम, शाहीद खान, सय्यद मुजाहिद, आकिब रिझवी, नजीर खान, सुमय्या मॅडम, शेख शबीना, शेख फतेमा, मोहम्मद इरफान, शेख जावेद, रफिक गौरी, रफिक नवाब, शेख मुजफ्फर आदी शिक्षक उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद उर्दू शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी बाबर लाला, शेख तसलीम, नदीम भाई, सोहेल भाई, रियाज खान, समीर अहमद, अनसार खान तसेच पालकवर्गाचीही उपस्थिती लाभली. आनंद मेळ्यात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार करून आणलेल्या विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल विशेष आकर्षण ठरले. मंचुरियन, बिर्याणी, कस्टर्ड, समोसे, गुलाब जामुन आदी स्वादिष्ट पदार्थांचा यामध्ये समावेश होता. सुमारे ४० विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
या आनंद मेळ्याचा शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला. सर्व उपस्थितांच्या चेहऱ्यावर समाधान व उत्साह दिसून येत होता. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, सहकार्याची भावना व सर्जनशीलता विकसित होते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.
