कराटे स्पर्धेत दहागावच्या विद्यार्थ्यांचे सुवर्णयश! स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूलची राज्यस्तरावर दणदणीत कामगिरी

लोकवेध न्यूज नेटवर्क

उमरखेड :-

वाशिम जिल्हा कराटे असोसिएशन आणि मेरा युवा भारत वाशिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७ वी माँ साहेब जिजाऊ चषक खुली राज्यस्तरीय कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत स्टुडंट्स वेलफेअर इंग्लिश मीडियम स्कूल, दहागाव येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत सुवर्णयश संपादन केले.

या राज्यस्तरीय स्पर्धेत शाळेच्या समृद्धी संजय गोटे, श्रीनय शशिकांत आखरे, गौरी शशिकांत आखरे आणि ईश्वरी अविनाश जाधव या विद्यार्थ्यांनी आपली कराटेतील गुणवत्ता सिद्ध केली. या चारही विद्यार्थ्यांनी मिळून तीन सुवर्णपदके व एक रौप्य पदक पटकावले असून त्यांच्या या यशामुळे शाळेचे नाव जिल्हा व राज्यस्तरावर उज्वल झाले आहे.

नियमित सराव, काटेकोर शिस्त आणि आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश मिळवले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संस्थेचे अध्यक्ष दर्शन अग्रवाल, उपाध्यक्ष एन. आर. वड्डे, सचिव नितीन भुतडा, सपना अग्रवाल, व्यवस्थापक आशिष लासीनकर, शाळेचे मुख्याध्यापक एम. पी. कदम, मुख्याध्यापिका पल्लवी पराते, शिक्षकवृंद, पालकवर्ग तसेच कराटे प्रशिक्षक विलास भोसले यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.या यशामुळे शाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असून, दहागाव परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या