कोर्ट मॅरेजचा सूड थेट खुनात ! प्रेमविवाह न पचल्याने जावयाची निर्घृण हत्या; घटनेने फुलसावंगी हादरली पुढारी वृत्तसेवा / महागाव महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे प्रेमविवाहाचा राग,जात–प्रतिष्ठेचा अहंकार आणि सूडाची विकृती याने थेट खुनाचा कळस गाठला आहे.कोर्ट मॅरेज केल्याचा गुन्हा न, पचवता स्वतःच्या जावयालाच निर्दयपणे संपवण्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण फुलसावंगी परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी महागाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस कायदा कलम १०३(१), ३(५), ३५१(२)(३) अन्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. मृत तरुणाचे नाव अनुज जाधव (रा. खिरवा, तहसील डेरापूर, जिल्हा कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे आहे. फिर्यादी नेकपाल सिंह भूरासिंह जाधव (वय ३३) यांच्या तक्रारीनुसार, अनुज याचा विवाह ०८ जानेवारी २०१८ रोजी इलाहाबाद उच्च न्यायालय येथे कोर्ट मॅरेज पद्धतीने पिंकी देवी हिच्याशी झाला होता. हा विवाह पिंकीचे वडील भारतसिंह मर्दानसिंह जाधव (वय ५२) आणि भाऊ रवी भारतसिंह जाधव (वय २६, रा. फुलसावंगी) यांना सुरुवातीपासूनच मान्य नव्हता. तक्रारीनुसार, आरोपी पिता–पुत्रांनी अनुज व त्याच्या भावाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जीवाला धोका असल्याने अनुज मूळ उत्तर प्रदेशात न जाता सारंगपूर येथे वास्तव्यास होता. मात्र, व्यवसायाचे आमिष दाखवून विश्वासघातकी पद्धतीने जून २०२५ मध्ये अनुज, त्याची पत्नी आणि दोन नाबालिग मुलांना फुलसावंगी येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर ०६ जानेवारी २०२६ रात्री ११ ते ०७ जानेवारी २०२६ सकाळी ६ या काळात संगनमताने अनुजची निर्घृण हत्या केल्याचा थेट आरोप आहे.मृतदेह ज्या खोलीत आढळला ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.खोलीभर प्रचंड रक्त सांडलेले, डोक्याच्या मागील बाजूस घातक जखमा, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले, आणि धक्कादायक म्हणजे तोंडात मंजन (गुडाकू) लावलेले आढळून आले. या घटनेची तक्रार २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.४२ वाजता दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहेत. प्रेमविवाहाला मृत्यूदंड देणाऱ्या या क्रूर मानसिकतेने फुलसावंगीच नव्हे तर संपूर्ण तालुका हादरला असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे.

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क

महागाव :- 

महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथे प्रेमविवाहाचा राग,जात–प्रतिष्ठेचा अहंकार आणि सूडाची विकृती याने थेट खुनाचा कळस गाठला आहे.कोर्ट मॅरेज केल्याचा गुन्हा न, पचवता स्वतःच्या जावयालाच निर्दयपणे संपवण्याचा अमानुष प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने संपूर्ण फुलसावंगी परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या प्रकरणी महागाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून बीएनएस कायदा कलम १०३(१), ३(५), ३५१(२)(३) अन्वये गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

मृत तरुणाचे नाव अनुज जाधव (रा. खिरवा, तहसील डेरापूर, जिल्हा कानपूर देहात, उत्तर प्रदेश) असे आहे. फिर्यादी नेकपाल सिंह भूरासिंह जाधव (वय ३३) यांच्या तक्रारीनुसार, अनुज याचा विवाह ०८ जानेवारी २०१८ रोजी इलाहाबाद उच्च न्यायालय येथे कोर्ट मॅरेज पद्धतीने पिंकी देवी हिच्याशी झाला होता. हा विवाह पिंकीचे वडील भारतसिंह मर्दानसिंह जाधव (वय ५२) आणि भाऊ रवी भारतसिंह जाधव (वय २६, रा. फुलसावंगी) यांना सुरुवातीपासूनच मान्य नव्हता.
तक्रारीनुसार, आरोपी पिता–पुत्रांनी अनुज व त्याच्या भावाला सतत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. जीवाला धोका असल्याने अनुज मूळ उत्तर प्रदेशात न जाता सारंगपूर येथे वास्तव्यास होता. मात्र, व्यवसायाचे आमिष दाखवून विश्वासघातकी पद्धतीने जून २०२५ मध्ये अनुज, त्याची पत्नी आणि दोन नाबालिग मुलांना फुलसावंगी येथे बोलावून घेण्यात आले.
त्यानंतर ०६ जानेवारी २०२६ रात्री ११ ते ०७ जानेवारी २०२६ सकाळी ६ या काळात संगनमताने अनुजची निर्घृण हत्या केल्याचा थेट आरोप आहे.मृतदेह ज्या खोलीत आढळला ते दृश्य अंगावर शहारे आणणारे होते.खोलीभर प्रचंड रक्त सांडलेले, डोक्याच्या मागील बाजूस घातक जखमा, संपूर्ण शरीर रक्ताने माखलेले, आणि धक्कादायक म्हणजे तोंडात मंजन (गुडाकू) लावलेले आढळून आले.

या घटनेची तक्रार २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ६.४२ वाजता दाखल करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल राठोड करीत आहेत. प्रेमविवाहाला मृत्यूदंड देणाऱ्या या क्रूर मानसिकतेने फुलसावंगीच नव्हे तर संपूर्ण तालुका हादरला असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जोरदार मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या