दलित कुटुंबीयांना भूमिहीन करून फसवणूक केल्याने संबंधितावर ॲट्रॉसिटी नुसार गुन्हे नोंद व्हावे !  या मागणी साठी २७ जानेवारी पासून तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण 

 

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क 

महागाव:- 

 

डोंगरगाव ता. महागांव येथील बौद्ध समाजातील विमल बबन हाडशे तसेच हिरामण शंकर हाडशे या शेतकऱ्यांना त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची संपूर्ण जमीन हडप करण्यात आली. भोगवटदार क्रमांक दोनची जमीन एक करून हाडशे कुटुंबीयांना नाममात्र मोबदला देऊन ती जमीन तायरखा रहीमखा पठाण यांनी वैशाली श्रीकांत उपलेंचवार यांना विकली. सदर जमीन अल्पावधीतच दीड कोटी रुपयाला जीएनआय इंफास्टट्रक्चर लि. औरंगाबाद या कंपनीला विकण्यात आली. यामध्ये बौद्ध समाजाच्या कुटुंबीयांच्या अज्ञानाचा फायदा घेत फसवणूक करण्यात आली. संबंधित कुटुंबीयांना न्याय मिळावा याकरिता त्यांच्या वतीने सय्यद मुदसिर सय्यद जमील यांनी हे संबंधितांना त्वरित न्याय न मिळाल्यास २७ जानेवारीपासून तहसील कार्यालया समोर उपोषणास बसणार असल्याचा प्रशासनास गर्भित इशारा दिला आहे.

 

  जीएनआय इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीने डोंगरगाव येथील शेत सर्वे नं. १३८ क्षेत्रफळ ४.०० हे.आर. मध्ये गिट्टीक्रेशर खदान हा प्रचंड कारखाना सुरू केला आहे. गरीब अशिक्षित मागासवर्गीय असलेल्या हिरामण हाडसे व त्यांच्या कुटुंबातील नागरिकांना भूमीहीन करून त्यांची जमीन मोठ्या किंमतीमध्ये इतरांना विकण्यात आली. हाडशे कुटुंबाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन अधिकारी व कंपनीच्या संबंधितांनी एक प्रकारे मागासवर्गीय कुटुंबीयांची फसवणूक केली असल्याचा आरोप सय्यद मुदसिर सय्यद जमाल यांनी विभागीय आयुक्त अमरावती यांना दिलेल्या निवेदनातून नमूद केले आहे. शेतकरी हिरामण हाडसे यांची या प्रकारामुळे प्रकृती खालावली आहे. त्यामुळे या दलित शेतकरी कुटुंबीयांनी सय्यद मुदशीर सय्यद जमाल यांना न्यायालयीन व इतर शासकीय कामानिमित्ताने येणाऱ्या सर्व गोष्टी करण्यासाठी मुक्त्यारपत्र दिले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वतीने लढण्याचा अधिकार प्राप्त झाला. करिता संबंधित प्रकरणांमध्ये फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांना त्यांची जमीन त्यांना परत मिळवून देण्यासाठी २६ जानेवारी पासून महागाव तहसील कार्यालयाच्या समोर समोर उपोषण बसणार असल्याचे प्रशासनाच्या निर्देशनास आणून दिले आहे.

गिट्टीक्रेशर कंपनी कारखाना तात्काळ बंद करण्यात यावा. बौद्ध समाजाच्या अशिक्षित शेतकऱ्याची फसवणूक झालेल्या प्रकरणात ज्या शासकीय व निमशासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आलेला आहे, त्या सर्वावर ऍट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल व्हावेत, ही मागणी घेऊन २७ जानेवारी २०२६ पासून सय्यद मुदसिर सय्यद जमाल सामाजिक कार्यकर्ते डोंगरगाव हे महागाव तहसील कार्यालयाच्या प्रशासकीय इमारती समोर उपोषणास बसणार असल्याचे कळते. या प्रकरणांत ताहेरखान रहीमखान पठाण, वैशाली श्रीकांत उपलेंचवार, जीएनआय इन्फोक्रस्ट्रक्शन लि. औरंगाबाद, जिल्हाधिकारी यवतमाळ, उपविभागीय अधिकारी उमरखेड, तहसीलदार महागाव, दुय्यम निबंधक अधिकारी महागाव, मंडळ अधिकारी मोरथ,तलाठी डोंगरगाव यांना गैरअर्जदार करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या