फुलसावंगीत बनावट दारूचा कारखाना ?उत्पादन शुल्क विभाग मुगागिळून गप्प, मद्य प्रेमाच्या जीवाशी खेळ,सर..कार च्या, त्या “वाईन बार वरील  विश्वासाला तडा..

संग्रहित छायाचित्र.

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :-
तालुक्यातील फुलसावंगी येथे बनावट दारूची सर्रास विक्री होत असून याठिकाणी बनावट तयारकरण्याचाकारखानाअसल्याचेकळते.एका सर.. कार च्या वाईन बार.अधून या बनावट दारूची  खुलेआम विक्री सुरू असल्याचे मद्य प्रेमीमधून गंभीर आरोप समोर आले असून,हा प्रकार म्हणजे कायद्याच्या तोंडावर थेट थुंकण्याचाच प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. येथील बनवायदारूच्या कारखान्यात अनेक प्रतिष्ठित भागीदार असल्याचे कळते.अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण गैरप्रकाराकडे महाराष्ट्र उत्पादन शुल्क विभाग डोळेझाक करत असल्याचा थेट आरोप होत आहे. फुल सावंगी हे बनावट दारू आणि गांजा विक्रीचे हब झाले आहे. याकडे उत्पादन शुल्क विभाग, पोलीस प्रशासन का ? डोळे झाक करत आहे. असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दुकानात खोटे लेबल लावलेल्या, संशयास्पद बाटल्यांमधील आणि निकृष्ट दर्जाची दारू सर्रास विकली जात आहे. ही दारू कोणत्या ठिकाणी, कोणाच्या माध्यमातून तयार होते, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसतानाही तिची विक्री बिनधास्त सुरू आहे. यामुळे मद्य प्रेमींचे आरोग्य थेट धोक्यात आले असून,एखादी मोठी जीवघेणी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारत येणार नाही.
या प्रकरणाबाबत वारंवार तक्रारी करूनही उत्पादन शुल्क विभागाने साधी चौकशी करण्याचीही तसदी घेतलेली नाही,ही बाब विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे.दारू दुकान शासनमान्य आहे,मग त्यातून विकली जाणारी दारू बनावट कशी ? असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे.

बनावट दारूच्या या धंद्यामुळे तरुणाई, मजूर वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांचे आयुष्य धोक्यात घालण्यात येत आहे,तरीही संबंधित अधिकारी गप्प का आहेत ? हे, मौन निष्काळजीपणाचे आहे की कोणाच्या तरी संरक्षणाचे? असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.नागरिकांनी या प्रकरणाची तातडीने उच्चस्तरीय चौकशी, संबंधित दुकानाचा परवाना तात्काळ रद्द, दोषींवर कठोर फौजदारी कारवाई आणि या प्रकरणाकडे कानाडोळा करणाऱ्या अधिकाऱ्यांवरही थेट कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे.
——————————————————————————-
बनावट दारू विकारांना “आनंद..
फुलसावंगी मध्ये मागील अनेक वर्षापासून असलेल्या बनावट दारूला आनंदाने..विकत असल्याचे सामोरे येत असून या संदर्भात फुलसावंगी येथील काही प्रतिष्ठित नागरिक नाव न सांगण्याच्या अटीवर सर्व काही बोलून जातात. हा प्रकार संबंधित विभागाला माहीत असताना सुद्धा कार्यवाही होत नाही.ही शोकांतिका आहे.यांची अर्थपूर्ण मैत्री मद्य शौकीनांच्या जीवावर बेतत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या