शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला भ्रमणध्वनीवरून अश्लील भाषेत शिवीगाळ , मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह,महागाव पोलिसात तक्रार
⚫लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव:-
महागाव तालुक्यातील इजणी येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक प्रमोद साहेबराव वानखेडे हे मागील बऱ्याच दिवसांपासून वादग्रस्त ठरत आहेत.त्यांनी शाळेचे भंगार विकल्याच्या कारणावरून मोठे वादंग उठले होते. याचं दरम्यान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत चे सदस्य बिपीन पवार यांनी आपल्या पाल्याकडून तथा अन्य विद्यार्थ्यांकडून शाळा का ? झाडून घेता अशी विचारणा केली असता सदर शिक्षणाने मग काय मी, शाळा झाडू का ? असा उलट प्रश्न उपस्थित केला.दरम्यान पवार म्हणाले आपल्या शाळेची नवाटी दरवर्षी आपण हराशी करतो. यातून एक कर्मचारी साफसफाई करण्याकरता लावावा असे सुचविल्या गेले.परंतु त्यांच्या दोघांच्या संभाषणामध्ये मुख्याध्यापक वानखेडे पवार यांच्यावर चांगलेच भडकले.त्या पैशातून आम्ही विविध कामे करत असतो.तसा एक कर्मचारी आम्ही लावले आहे.परंतु त्यांचेकडून आम्ही शाळेची स्वच्छता करून घेत नाही.तुम्ही कधी शाळेत शिकले नाही का ? तुम्ही शाळा झडली नाही का ? असा वानखेडे यांनी सवाल पवार यांना केला. हे सारं बोलताना असताना वानखेडे हे, अश्लील भाषेत बोलत असल्याचे पवार यांनी दिलेल्या ओडीओक्लिपमधून स्पष्टझाले.त्यांनी त्याच्या दोघांतील संभाषणाचा ऑडिओ लोकप्रिय न्यूज पोर्टल लोकवेधला पाठविला असून सदर संभाषण अत्यंत खालच्या भाषेत आहे.त्यामुळे पवार यांचा सन्मान दुखावला आहे.
एखाद्या शिक्षकाने अशा भाषेत एखाद्या स्थानिक लोकप्रतिनिधीला तथा शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला असे बोलणे हा, असभ्य पाना म्हणावा लागेल.या संदर्भात पवार हे, अनेकदा म्हणाले सर ,आपण व्यवस्थित बोला आपण शिक्षक आहात, याची जाण ठेवा याची अनेकदा जाणीव करून दिली परंतु संबंधित शिक्षक मात्र काही ही ऐकण्यास तयार नव्हते.या उलट त्यांनी धारेगाव , शेनंद, टेंभुर्घरा , बोथा, मोरथ, येथे जाऊन माझी व माझ्या बापाची हिस्ट्री विचार’ तुला असे वाटत असेल मी या सर्विसच्या भरवशावर आहे. आशा सर्विस वर मी मुततो.. मला काही फरक पडत नाही तुमच्या लेकरावर आम्ही लक्ष देणे सोडले आहे. कोणी तिला काम सांगत नाही आणि कोणी शिकवतही नाही तुम्हाला आमचे शिक्षण पटत नसेल तर शहरातल्या कोणत्याही शाळेत नेऊन टाका आम्हाला काही अडचण नाही अशा भाषेत संबंधित मुख्याध्यापकांनी पवार यांना सुनावले.मला इंद्रजीत भाऊ ययाती भाऊ आणि मोहिनी ताई यांचा मोठा आशीर्वाद आहे. त्यामुळे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही. तुम्हाला कुठे तक्रार करायची ते करा अशा भाषेत त्यांनी पुढे बोलताना सुनावले. या प्रकरणी पवार यांनी महागाव पोलिसात तक्रार दाखल केली असून यात सदर शिक्षणावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता
वर्तवली जात आहे.तसेच गटविकास अधिकारी महागाव यांना सुद्धा या संदर्भात एका निवेदनाद्वारे अवगत करण्यात आले आहे.दरम्यान काल दिनांक सहा जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांच्याकडे पवार यांनी सदर मुख्याध्यापक प्रमोद साहेबराव वानखेडे यांच्या वागणुकीची तक्रार केली व कारवाईची मागणी केली आहे. यात मुख्य कार्यकारी अधिकारी काय कार्यवाही करतील याकडे इजणी वासियांचे लक्ष वेधले आहे.
——————————————————————————-
या संदर्भात लोकप्रिय न्यूज पोर्टल लोकवेधणे वानखेडे यांच्याशी संपर्क करून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता मला सध्या वेळ नाही प्रत्यक्ष आपल्याला भेटून हकीगत सांगू
असे सांगितले.
