प्रेक्षकांच्या उत्साहात रंगणार ‘जय हिंद क्रीडा मंडळ, पोफाळी’आयोजित भव्य खुले हॉलीबॉल स्पर्धा

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
पोफाळी (ता. उमरखेड)
पोफाळी नगरीत क्रीडारसिकांच्या डोळ्यात चमक निर्माण करणारी आणि खेळाडूंच्या कौशल्याला मंच देणारी भव्य अशी खुली हॉलीबॉल स्पर्धा यंदाही ‘जय हिंद क्रीडा मंडळ पोफाळी’च्या वतीने उत्साहात आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी ज्या पद्धतीने या स्पर्धेची प्रतीक्षा होते, त्या परंपरेला या वर्षीही सलाम करत ०६ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी ठीक ८:३० वाजता सामन्यांचा शानदार प्रारंभ होणार आहे.
या स्पर्धेत परिसरातील उत्कृष्ट खेळाडू, तरुण संघ आणि अनुभवी खेळाडू यांचा खेळ कौशल्य पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. युवकांच्या खेळाडूवृत्तीतून शिस्त,संघभावना आणि नेतृत्व विकसित व्हावे,या उद्देशाने दरवर्षी मंडळाकडून अशा उपक्रमांचे आयोजन केले जाते.मंडळातील पदाधिकारी व आयोजकांनी सर्व खेळाडू,क्रीडाप्रेमी आणि प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामन्याचा रोमांचक आनंद घ्यावा, असे आवाहन केले आहे.पोफाळी नगरीत उत्साहाचा माहोल, क्रीडा संस्कृतीला नवी दिशा आणि तरुणाईला प्रोत्साहन देणारी ही स्पर्धा यंदाही संस्मरणीय ठरणार,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
