मातोश्री विद्यालय महागावचा इतिहासिक बहुमान !   विभागीय विजेतेपद पटकावून थेट राज्यस्तरावर प्रवेश

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव :

 

क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या अधिपत्याखाली अमरावती विभागात पार पडलेल्या २०२५-२६ च्या शालेय S विभागीय डॉजबॉल स्पर्धेत मातोश्री विद्यालय महागावच्या संघाने दैदिप्यमान यशाची नोंद केली. विभागीय विजेतेपद पटकावत शाळेने थेट राज्यस्तरावर प्रवेश मिळवला आहे. यवतमाळ जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक मानाचा क्षण ठरला आहे.

 

बुलढाणा येथे झालेल्या या स्पर्धेत महागावच्या १७ वर्षे वयोगटातील मुलांच्या संघाने बुलढाणा, अमरावती (ग्रामीण) आणि अमरावती (शहर) या मजबूत प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत अव्वल स्थान मिळवले. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मातोश्री विद्यालयाला मिळाला आहे.संघामध्ये कर्णधार पार्थ प्रमोद चटने, सिद्धांत पंजाब देशमुख,आर्यन राजेश देशमुख, मंदार सुधीर देशमुख, आदित्य तानाजी शिंदे, तुषार गजानन वैद्य,वेदांत गजानन माहुलकर, स्वराज रविकांत पतंगराव,दीप गणेश हिंगाडे, आदित्य गजानन नेवारे,रुद्र प्रवीण कुटे व अभय गजानन आडे यांचा समावेश होता.

 

विशेष म्हणजे, डॉजबॉलमध्ये विभागीय विजेतेपद मिळवणारा हा यवतमाळ जिल्ह्यातील पहिला संघ ठरला असून, याचे सर्वत्र कौतुक होत आहे. शाळेचे संस्थापक दिगंबर जगताप यांनी खेळाडू, प्रशिक्षक आणि शाळा व्यवस्थापनाचे अभिनंदन केले. परिसरातील नागरिक, पालक व माजी विद्यार्थ्यांनीही या विजयाचे जल्लोषात स्वागत केले.राज्यस्तरावरही हा दमदार संघ आणखी यश मिळवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत असून, क्रीडा क्षेत्रात ही कामगिरी नवीन पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या