ग्रामीण प्रतिभेला आंतरराष्ट्रीय व्यासपीठ समीउल्ला पठाण दुबईत भारताकडून करणार जोरदार खेळ  विधानपरिषद सदस्य हेमंत पाटील यांचे आर्थिक सहकार्य

 

,

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

हिंगोली : 

 

कळमनुरी तालुक्यातील जवळा पांचाळ या ग्रामीण भागातील मुकबधिर क्रिकेटपटू समीउल्ला खान अन्सार खान पठाण यांनी मराठवाड्याचा क्रीडा इतिहास उजळून टाकला आहे. भारतीय मुकबधिर क्रिकेट संघासाठी त्यांची निवड निश्चित झाली असून ते दुबई येथे ५ ते ८ डिसेंबर २०२५ या कालावधीत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

 

राष्ट्रीय पातळीवरील दमदार कामगिरी, जिद्द, शिस्त आणि सततच्या परिश्रमाच्या जोरावर समीउल्ला पठाण यांनी आंतरराष्ट्रीय व्यासपीठाची मजल गाठली आहे. या संघात महाराष्ट्रातून फक्त दोनच खेळाडूंची निवड झाली असून मराठवाड्यातून समीउल्ला पठाण हे एकमेव खेळाडू आहेत, याचा अभिमान संपूर्ण विभागाला वाटत आहे.यापूर्वी समीउल्ला पठाण यांनी अनेक महत्त्वपूर्ण स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करून आपली ओळख निर्माण केली असून त्यांना पुढील स्पर्धेसाठी विधानपरिषदेचे आमदार हेमंत पाटील यांनी भेट घेऊन मनापासून शुभेच्छा दिल्या तसेच आर्थिक सहकार्यही केले.

 

ग्रामीण भागातून येणाऱ्या प्रतिभेला संधी मिळाली तर आंतरराष्ट्रीय यश दूर नाही, याचे प्रेरणादायी उदाहरण समीउल्ला पठाण यांनी साकारत कळमनुरी तालुका व हिंगोली जिल्ह्याचे नाव देशाच्या क्रीडा नकाशावर उंचावले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या