उमरखेडमध्ये जनशक्तीची ‘बस’ वेगात; विरोधकांच्या हल्ल्यांना नागरिकांचा सूर ,“आता बस !

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क
उमरखेड नगरपरिषद निवडणुकीत जनशक्ती पॅनेलच्या ‘बस’ प्रतीकाचा प्रचार वेगाने वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार तेजश्री संतोष जैन यांच्या संपर्क मोहिमा, विविध भागातील भेटी आणि प्रचारयात्रांना मिळणारा प्रतिसाद वाढत चालला आहे. महिलांपासून तरुणांपर्यंत नागरिकांचा जैन यांना मिळत असलेला मतदारांचा कौल हा निवडणुकीतील महत्त्वाचा कल मानला जात आहे.
विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या आरोप-टिप्पण्यांवर शहरात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. स्थानिक पातळीवरून “आता पुरे, आता बस.. असा सूर व्यक्त केला जात असून मतदार बदलाच्या भूमिकेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.प्रचाराच्या मैदानात विकास, मूलभूत सुविधा, पायाभूत कामे आणि शहर व्यवस्थापन हा मुद्दा अधिक ठळक होत आहे.जनशक्ती पॅनेलच्या प्रचारात उत्साह दिसत असतानाच मतदारांची मिटिंग, प्रत्यक्ष संपर्क आणि सभा या माध्यमातून उमेदवारांचा जनतेशी थेट संवाद सुरू आहे.आगामी निवडणूक शहराच्या राजकीय समीकरणांसाठी निर्णायक ठरेल,अशी जणभावना दिसून येत आहे.
उमरखेडच्या नगरपरिषदे साठीची ही निवडणूक केवळ पक्षीय नव्हे, तर शहराच्या विकास दिशेचे भविष्य ठरवणारी असल्याचे स्थानिकांचे मत आहे.विरोधांना आम्ही मतपेटीतूनच उत्तर देऊ असा तेजश्री जैन यांना दृढ विश्वास आहे.

