पांढरकवड्यात ‘अपक्षकडून सत्ता उलथवाट ? शंकर बडे यांच्या सभेला जनसागर ; बच्चू कडूंची सरकारवर झंझावात टीका

⚫ लोकवेध न्युज नेटवर्क 

पांढरकवडा नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार शंकर बडे यांच्या सभेला रविवारी उसळलेली अफाट गर्दी हे स्थानिक राजकारणातील मोठे समीकरण बदलणारे चित्र ठरले आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेला अपेक्षेपेक्षा कमी उपस्थिती पाहायला मिळाली होती, त्याच्या अगदी उलट या सभेने वातावरण रंगवले.

 

सभा संबोधित करताना शेतकरी नेते व माजी आमदार बच्चू कडू यांनी सरकारच्या विकास दाव्यांवर थेट प्रश्न उपस्थित करत राजकीय तापमान वाढवले. पांढरकवडा ग्रीन झोनमध्ये असल्याने शहरापासून २० किलोमीटरच्या आत एमआयडीसी प्रकल्पांना मंजुरी मिळू शकत नाही, याचा उल्लेख करीत त्यांनी भाजप-शिंदे सरकारच्या आश्वासनांची पोलखोल केली.कडूंच्या भाषणाचा खास मुद्दा म्हणजे शेतकरी प्रश्न, त्यांनी मंचावरून बोलतांना स्पष्ट टोला लगावत म्हटले.शिंदे साहेब चॉकलेट देऊन गेले,बहिणींना योजना दिल्या पण लाडक्या भावाला म्हणजे शेतकऱ्याला मात्र लुटले.कापसाला हमीभाव नाही, सोयाबीनला दर नाही.असे अनेक शेतकरी प्रश्न उपस्थित करून सरकारची पोलखोल केली.

 

जनसमुदायाच्या टाळ्यांच्या गजरात झालेल्या या भाषणात तरुण, महिला आणि शेतकरी वर्गाचा प्रतिसाद विशेष जाणवला. बडे यांच्या सभेत दिसलेली ही लोकलाट विरोधकांसाठी निश्चितच चिंतेचा विषय ठरू शकते.राजकीय विश्लेषकांच्या मते, पांढरकवडा नगरपरिषद निवडणूक पारंपरिक पक्षांच्या चौकटीबाहेर जाऊन अपक्ष उमेदवार आणि जनतेच्या प्रश्नांवर केंद्रीत होत आहे. या सभेनंतर स्थानिक राजकारणात नवीन गणिते, नवे गटबंध आणि राजकीय तणाव वाढणार याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.या आधी पांढरकवडा नगरपरिषदेवर प्रहारणे सत्ता काबीज केली होती. त्यादरम्यान बच्चू कडू यांनी मोठ्या प्रमाणात सभा घेऊन मतदारांना आपलेसे केले.याच धर्तीवर पुन्हा बच्चुभाऊ कडू यांची सभा यशस्वी आणि उमेदवाराला विजयी करणारी ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या