सुरेश भाऊ आव्हाड मित्रमंडळाकडून उभारली पाणपोई; तळपत्या उन्हात प्रवाशांना दिलासा


लोकवेध न्यूज नेटवर्क
महागाव :
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तापमानात झपाट्याने वाढ होत असून तळपत्या उन्हाच्या झळा नागरिकांना असह्य होत आहेत. अशा कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर गुंज येथील बसस्थानक चौकात सुरेश भाऊ आव्हाड मित्रमंडळाच्या वतीने पाणपोई उभारण्यात आली असून प्रवासी व ग्रामस्थांची तहान भागवण्यासाठी हा उपक्रम दिलासा देणारा ठरत आहे.
भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भाऊ आव्हाड यांच्या पुढाकारातून ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागात उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवासी, शेतकरी, विद्यार्थी तसेच नागरिकांना पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण भेडसावत असते. वाढत्या तापमानामुळे आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता या पाणपोईचे विशेष महत्त्व निर्माण झाले आहे.
सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेणारे सुरेश भाऊ आव्हाड हे रंजल्या-गांजल्या लोकांच्या मदतीसाठी कायम धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणून ओळखले जातात. विविध सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाने त्यांना भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे.


गुंज येथील बसस्थानक चौकात उभारण्यात आलेल्या या पाणपोईमुळे उन्हाच्या कडकडीत प्रवाशांना थंड पाण्याचा दिलासा मिळत असून नागरिकांकडून या उपक्रमाचे स्वागत व कौतुक केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या