जनशक्ती पॅनेलचा आत्मविश्वास वाढवणारा उमेदवार! माजी नगरसेवक संदीप ठाकरे यांची निवडणुकीत दमदार आघाडी

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
उमरखेड –
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती पॅनेलच्या उमेदवारीला वेग मिळाला असून माजी नगरसेवक संदीप ठाकरे यांनी पुन्हा एकदा आपल्या प्रभागातून जोरदार पुनरागमनाची तयारी दाखविली आहे.आपल्या प्रभागात व शहरात केलेल्या सेवाभावी कार्याची चुणूक दाखवत ठाकरे बद्दल असलेला जनतेचा दृढ विश्वास आजही तितकाच मजबूत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील कार्यकाळात आरोग्य सेवा, नागरिकांच्या सुखदुःखात तत्परता, स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने केलेला पाठपुरावा यामुळे ठाकरे हे युवा नेतृत्व म्हणून उदयास आले होते.सेवाभावी कामे कायम ठेवूनच पुन्हा जनतेच्या आशीर्वादाने विजय मिळवू,असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिकांमध्येही त्यांचा प्रचार जोरात असून संपर्क मोहिमेत त्यांची आघाडी असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दारासिंग रूडे यांच्या सुविद्य सौ.पत्नी सौ.संगीता दारासिंग रूडे यांना आपल्या प्रभागातून समाजासह स्थानिक मतदारांनी प्रतिसाद दिल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.त्यांनी प्रतिस्पर्ध्याला पराभूत करण्यासाठी प्रचारात वेग वाढविला आहे.मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलही उत्साहाचे वातावरण असून महिला मतदारांचा प्रतिसाद उल्लेखनीय दिसून येत जनशक्ती पॅनेलला लाभलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ह्या येथील ॲड.संतोष जैन यांच्या सुविद्य पत्नी आहेत. जैन हा निष्कलंक चेहरा सर्वांना चालणारा आहे.त्यामुळे सध्यातरी धनशक्ती पेक्षा जनशक्ती आघाडीवर असल्याचे एकंदरीत चित्र पाहावयास मिळत आहे.
