वागद इजारा येथे पशुसंवर्धन जागृकता अभियान उत्साहात संपन्न

⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क 

वागद इजारा : काळी दौलत खान पशु चिकित्सालय अंतर्गत पशुवैद्यकीय दवाखाना काळी (दौ) व महागाव तालुक्याच्या संयुक्त विद्यमाने वागद येथे पशुसंवर्धन जागृकता अभियान व कृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेतकरी नेते मनीष जाधव यांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या शिबिराला पशुपालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

अलीकडच्या काळात तोंड व पायखुरी या संसर्गजन्य रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत असून जनावरांच्या आरोग्याबाबत पशुपालकांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शिबिरामध्ये जनावरांचे मोफत उपचार, औषध वितरण, खच्चीकरण, वंधत्व तपासणी यांसह इतर रोगनियंत्रणाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वातावरणातील बदल आणि थंडीमुळे जनावरांमध्ये उद्भवणाऱ्या आजारांपासून संरक्षण करण्याबाबतही तपशीलवार माहिती देण्यात आली. आयोजित कार्यक्रमात पशु चिकित्सालय काळी दौलत खान संस्थाप्रमुख रुपेश नरवाडे, पशुवैद्यकीय दवाखाना पोखरीचे संस्थाप्रमुख गजानन राठोड तसेच करण चव्हाण, अनस मिर्झा बेग, गोपाल राठोड यांचे विशेष मार्गदर्शन मिळाले.या शिबिरास ह. भ. प. कैलाश राठोड, तुकाराम राठोड, गोविंद जाधव, कारभारी यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. पशुपालकांकडूनही अशा उपक्रमांची गावागावात आवश्यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या