सोसायट्यांची कागदपत्रे गोळा मोहीम सुरू; कर्जमाफीच्या चर्चेला वेग 

ज्ञानेश्वर ठाकरे:

 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क 

 

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक हालचालींना गती मिळाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील कार्यकारी सहकारी सोसायट्यांनी कर्जदारांची अद्ययावत माहिती गोळा करण्याची मोहीम सुरू करताच ग्रामीण भागात कर्जमाफीबाबतची चर्चा वेगाने पसरू लागली आहे.

 

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निर्देशानुसार ७/१२उतारा, आधार, पॅन, फॉर्मर आयडी, बचत खाते पासबुक, कर्ज खात्याची सीसीसी प्रत आणि मोबाईल लिंक पुरावा अशी कागदपत्रे तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे. कागदपत्रे नसल्यास वर्साय किंवा नोटरीकृत प्रत जमा करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

 

पाच ते सहा दिवसांच्या आत सर्व कर्जदारांनी कागदपत्रे द्यावीत, या आदेशानंतर सोसायट्यांकडे शेतकऱ्यांची मोठी गर्दी दिसत आहे. माहिती संकलनाचा वेग आणि अचानक वाढलेली धावपळ यामुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.सोसायट्यांनी वेळेत कागदपत्रे न देणाऱ्या सभासदांना स्पष्ट इशारा दिला असून बचत खाते किंवा कर्ज खाते नसल्यास तातडीने नवीन खाते उघडण्याच्या सूचना दिल्या आहेत.या हालचालींमुळे शेतकऱ्यांमध्ये कर्जमाफीची नवी आशा निर्माण झाली आहे. कर्जमाफीची घोषणा होणार का ? याकडे शेतकऱ्याचे लक्ष वेधले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या