जंगली जनावराच्या हल्यात जखमी शेतकऱ्याला तत्काळ मदत द्यावी; आमदार वानखेडे कडून विधानसभेत मुद्दा उपस्थित 

⚫लोकवेध न्यूज नेटवर्क / २८ फेब्रुवारी महागाव:-

 

 महागाव तालुक्यातील दगडथर येथील शेतकरी उत्तम मारोती खराटे यांच्यावर अस्वलाने हल्ला केला.या हल्ल्यात त्यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. जखमी शेतकऱ्याला वन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत व उपचाराची सोय करून द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.दरम्यान, २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी झालेल्या अवकाळी वादळ व पावसामुळे तालुक्यातील गहू, हरभरा, हळद आणि ज्वारी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काढणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके आडवी पडल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

या दोन्ही प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आमदार किसनरावजी वानखेडे यांनी विधानसभेत मुद्दा मांडला.जखमी शेतकऱ्याला मदत द्यावी आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक सहाय्य जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली.भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीनभाऊ भुतडा यांनीही शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे सांगितले.शेतकरी अडचणीत असल्यामुळे शासनाने तात्काळ मदतीचा निर्णय घ्यावा,अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या