समाजभावनांचा आदर राखत जाहीर दिलगिरी; ‘त्या’ उल्लेखाबाबत माफी

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव / उमरखेड

महागाव येथील देशी दारू दुकान बंद करण्याबाबत येत्या १६ एप्रिल रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रसिद्ध झालेल्या एका बातमीतील मजकुराबाबत आता दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

सदर बातमीत “कलाल आणि दलाल यांच्या आमिषाला बळी पडल्यास त्याचा त्रास स्वतःलाच होईल” असा उल्लेख करण्यात आला होता. ही बातमी पूर्णपणे जनहिताच्या दृष्टीने प्रकाशित करण्यात आली होती. मात्र, या उल्लेखामुळे काही समाजघटकांच्या भावना दुखावल्या गेल्याची बाब समोर आली आहे.

या संदर्भात उमरखेड येथील मिथिलेश भाऊ जयस्वाल यांनी लोकप्रिय मराठी न्यूज पोर्टल लोकवेध न्यूज शी बोलतांना नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या भावनांचा आदर राखत लोकवेध कडून आता जाहीर दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.

“सदर बातमीमुळे कुणाच्याही भावना दुखावल्या असतील, तर आम्ही मनःपूर्वक माफी मागतो. समाजमन दुखावण्याचा आमचा मुळीच हेतू नव्हता. अनवधानाने हा उल्लेख झाला असून याबद्दल आम्ही खेद व्यक्त करतो,” असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, जनहिताच्या प्रश्नांवर भाष्य करताना समाजातील सर्व घटकांचा सन्मान राखण्याची भूमिका कायम ठेवली जाईल, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

महागावात बांधकामांची पारदर्शकता तपासणीच्या रडारवर; प्रभाग १ व ७ साठी माहिती मागणीचा अर्ज लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- महागाव नगर पंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक ०१ व ०७ मधील सर्व बांधकामे आणि त्यावर सुरू असलेल्या व्यावसायिक उपक्रमांची सविस्तर माहिती मिळवण्यासाठी अॅड. विवेक भाऊराव देशमुख यांनी नगर पंचायत प्रशासनाकडे अधिकृत विनंती अर्ज सादर केला आहे. सदर अर्जामध्ये प्रभागातील सर्व प्लॉटवरील बांधकामांची परवानगी, मंजूर नकाशे,तसेच संबंधित इमारतींमध्ये सुरू असलेल्या व्यवसायांची (किराणा दुकान, जनरल स्टोअर्स, कापड दुकान, हॉटेल व इतर दुकाने) वाणिज्य परवानग्या आणि आदेश यांची सत्यप्रत मागविण्यात आली आहे. अर्जदारांनी स्पष्टपणे नमूद केले आहे की, संबंधित सर्व इमारतींच्या बांधकाम परवानग्या व नकाशे तसेच व्यावसायिक वापरासाठी आवश्यक असलेल्या वाणिज्य परवानग्या व आदेशांची माहिती उपलब्ध करून देण्यात यावी.या मागणीमुळे प्रभागातील अनधिकृत बांधकामे किंवा नियमबाह्य व्यावसायिक वापर उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महागाव नगर पंचायत प्रशासनाकडून या अर्जावर काय कार्यवाही होते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, या विषया संदर्भात प्रभाग एक आणि सात मधील व्यावसायिकांनी आणि या अर्जाच्या मागणीवर संतोष व्यक्त करत सदर तक्रारदाराच्या सनदी संदर्भात मोठी चर्चा रंगली होती.एकाच व्यक्तीचा नावे दोन लायसन कसे बरे ? असा सवालही यावळी उपस्थित केला जात असून सदर तक्रारदार नेमके कोण ? आहेत.. यात वडिलांचं बदलून गुगली..खेळी करून मी तो नव्हेच अशी तर नंतर भूमिका बजावल्या जाईल अशी जनभावना आहे. विवेक..भैय्या..सा…. की ? भाऊराव…याचा नागरिकांना संभ्रम निर्माण झाला आहे.याच प्रभात वाईनबार आहे.वाईंबार आणि देशी दारू दुकान संदर्भात येत्या काही तासांत मतदान प्रक्रिया होणार असल्याने तक्रार कर्त्याने सदर प्रभागातील नागरिकांना मुद्दाम भीती दाखविण्यासाठी तर नाही ना..हा फंडा वापरला अशा विविध चर्चेला उधाण आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

तहानलेल्या प्रवाशांना दिलासा; महामानवाच्या जयंतीनिमित्त महागावात ‘स्मृती पाणपोई’चे लोकार्पण लोकवेध न्यूज नेटवर्क महागाव :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त महागाव येथे सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला.स्व. कु.श्रावणी निलेश नरवाडे हिच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रवासी व नागरिकांसाठी ‘पाणपोई’चे लोकार्पण मंगळवार,१४ एप्रिल रोजी करण्यात आले. महागाव बस स्थानक परिसरातील वाढती वर्दळ लक्षात घेता,शुभम सर्विसिंग सेंटरजवळील ट्रॅव्हल्स पॉईंट येथे ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे.रणरणत्या उन्हात प्रवाशांची तहान भागविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे. समता,स्वातंत्र्य आणि बंधुत्वाची शिकवण देणाऱ्या डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत, ‘पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे’ या तत्त्वाची जाणीव करून देणारा हा उपक्रम ठरला. चवदार तळ्याच्या सत्याग्रहातून दिलेला समानतेचा संदेश या माध्यमातून प्रत्यक्ष कृतीत उतरविण्यात आला आहे.शिक्षण आणि समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत,विजय खंदारे यांच्या सौजन्याने ही पाणपोई उभारण्यात आली.“माणुसकीच्या नात्याने केलेले छोटेसे कार्यही समाजासाठी मोठा संदेश देऊन जाते,असा भाव यावेळी व्यक्त करण्यात आला.या पाणपोईचे उद्घाटन भाजप समन्वयक नितीन भुतडा व आमदार किसनराव वानखेडे यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष प्रमोद भरवाडे, ठाणेदार धनराज निळे, प्राचार्य शरदचंद्र डोंगरे, जेष्ठ पत्रकार गजानन वाघमारे, संजय भगत, महागाव पत्रकार महासंघाचे अध्यक्ष गणेश भोयर, ज्ञानेश्वर ठाकरे, निलेश नरवाडे यांच्यासह अनेक पत्रकार व नागरिकांची उपस्थिती होती. स्व. श्रावणीच्या स्मृती जपत उभारलेली ही ‘पाणपोई’ आता महागावातील प्रवाशांसाठी दिलासा ठरत, समाजसेवेचा जिवंत संदेश देत राहणार आहे.