गुन्हे तपासात वेग आणि अचूकता वाढवणारे पाऊल : उमरखेड पोलिसांकडे मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन दाखल”

 

लोकवेध न्यूज नेटवर्क / ०२ एप्रिल २०२६

उमरखेड :- 

 

उमरखेड पोलिस स्टेशन येथे आज मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनचे लोकार्पण उत्साहात संपन्न झाले. गुन्हा घडलेल्या ठिकाणी त्वरित पोहोचून अत्याधुनिक पद्धतीने पुरावे संकलित करण्याची सुविधा या व्हॅनमुळे उपलब्ध झाली आहे.

या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनच्या माध्यमातून रक्ताचे नमुने, फिंगरप्रिंट्स, डीएनए (DNA) तसेच इतर महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्यापूर्वीच शास्त्रोक्त पद्धतीने गोळा करता येणार आहेत. यामुळे गुन्हा घडल्यानंतर होणारा विलंब टाळून तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे.

या उपक्रमामुळे गुन्हे उकलण्याचे प्रमाण वाढण्यास मदत होणार असून, पोलिस प्रशासनाने केलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

कार्यक्रमावेळी भाजपचे समन्वयक नितीन भुतडा, आमदार किसनराव वानखेडे, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंतराव गायकवाड, सुनील गोपीनवाड,जितेंद्र पवार, साजीद जहागिरदार, विरेंद्र खंदारे, नगरसेवक सुरेंद्र कोडगिरवार, करूणाताई कुबडे यांच्यासह पत्रकार आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलिस प्रशासनाच्या या पुढाकाराबद्दल उपस्थितांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या