१५ वर्षांखालील शालेय क्रिकेटपटूंकरिता निवड चाचणी २३ नोव्हेंबरला
- ⬛ क्रीडा विश्व
⚫ लोकवेध न्यूज नेटवर्क
पांढरकवडा :
विदर्भ क्रिकेट संघटना, नागपूरतर्फे आयोजित भास्कर जोशी स्मृती क्रिकेट स्पर्धांसाठी १५ वर्षे आतील शालेय मुलांची जिल्हास्तरीय निवड चाचणी येत्या रविवार, दि. २३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता तालुका क्रीडा संकुल, पांढरकवडा येथे घेण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हा संघासाठी उदयोन्मुख क्रिकेटपटूंना आपली कौशल्यं सादर करण्याची ही महत्वपूर्ण संधी उपलब्ध झाली आहे.
या निवड चाचणीसाठी ०१ सप्टेंबर २०१० ते ३१ ऑगस्ट २०१३ दरम्यान जन्म झालेली मुले पात्र ठरणार आहेत. निवड चाचणी पूर्णपणे निशुल्क असून नागपूर येथून येणारी अधिकृत निवड समिती प्रत्यक्ष उपस्थित राहून खेळाडूंचे मूल्यमापन करणार आहे.
________________________________________________
इच्छुक शालेय विद्यार्थ्यांनी खालील कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे :
शाळेचे बोनाफाईड प्रमाणपत्र
आधार कार्ड
जन्मतारखेचा दाखला
स्वतःचा क्रिकेट किट
पांढरा क्रिकेट पोशाख
________________________________________________
याबाबत माहिती देताना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या यवतमाळ जिल्हा समितीचे अध्यक्ष श्री. नितेश उपाध्याय यांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून या उपक्रमाबाबत यवतमाळ जिल्हा क्रिकेट समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ बाळू नवघरे यांनी जिल्ह्यातील प्रतिभावान क्रिकेटपटूंना राज्यस्तरीय स्पर्धेकडे वाटचाल करण्यासाठी ही उत्कृष्ट संधी असल्याचे सांगितले.
