एमपिएल क्रिकेट सामन्यांचे १६ नोव्हेंबरपासून आयोजन महागावमध्ये प्रथमच रंगणार प्रीमियर लीग सामने

लोकवेध न्यूज नेटवर्क

महागाव:

ग्रामीण भागातील क्रिकेटपटूंना मोठे व्यासपीठ मिळावे आणि क्रिकेटच्या उत्साहाला नवी दिशा लाभावी या उद्देशाने महागाव येथे प्रथमच तालुकास्तरीय “महागाव प्रीमियर लीग”क्रिकेट स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयपीएलच्या धर्तीवर ही स्पर्धा आयोजित करण्यात येत असून, त्यामुळे महागाव परिसरात क्रिकेटचा तापमानाचा पारा चांगलाच वाढला आहे.

 

या लीग स्पर्धेला १६ नोव्हेंबरपासून महागाव येथील क्रीडा संकुलाच्या मैदानावर सुरुवात होणार आहे. यामध्ये १२ नामांकित संघ सहभागी होणार असून, या संघांमधील खेळाडूंचा आयपीएलप्रमाणे लिलाव घेण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेला अधिकृत आणि व्यावसायिक रूप प्राप्त झाले आहे.स्थानिक युवक क्रिकेटपटूंना आपले कौशल्य सादर करण्याची आणि मोठ्या मंचावर खेळण्याची ही सुवर्णसंधी ठरणार आहे. तालुकास्तरावर ‘ऑक्शन’च्या माध्यमातून संघ रचण्याची ही पहिलीच वेळ असल्याने खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.सामन्यांचे वेळापत्रक जाहीर होताच मैदानावर थरार अनुभवण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे. कोणता संघ विजेतेपद पटकावतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.प्रथमच होणाऱ्या या महागाव प्रीमियर लीगने महागावच्या क्रिकेट इतिहासात नवा अध्याय जोडला असून, ग्रामीण पातळीवर व्यावसायिक क्रिकेटची नवी वाट या स्पर्धेतून निर्माण होणार आहे.या स्पर्धेचे आयोजन संतोष जाधव, विनोद जाधव, श्रीकांत राऊत, राजू राठोड, विनोद पावडे, राणू कुरेशी, टिपू सय्यद, शिवाजी नरवाडे, जय शिंदे, आशिष हातमोडे, शरद काळे यांच्या पुढाकारातून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या