उमरखेड नगराध्यक्षपदावर सहा दावेदार निधी भूतडांच्या दमदार प्रवेशाने निवडणूक रंगणार !

 

 

⚫ ज्ञानेश्वर ठाकरे

 

लोकवेध न्यूज नेटवर्क

 

उमरखेड नगर परिषद निवडणुकीच्या रणांगणात आज मोठी राजकीय हलचल झाली. नामांकन दाखल करण्यासाठी अवघे तीन दिवस शिल्लक असताना नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवारांनी अर्ज दाखल करत उमरखेडच्या राजकारणात खळबळ उडवली आहे. यामध्ये भाजपाचे जिल्हा समन्वयक नितीन भूतडा यांच्या सुविद्य पत्नी निधी भूतडा यांच्या उमेदवारीची सर्वाधिक चर्चा रंगत आहे.

नगरपरिषद निवडणुकीची अधिसूचना लागून चार दिवस उलटले तरीही उमेदवारांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता.

शिवसेना (शिंदे) पक्ष वगळता ना महायुतीकडून, ना महाविकास आघाडीकडून हवा तयार झाल्याची लक्षणे दिसत होती.

निवडणूक विभागाकडे २५ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असले तरी ऑफलाइन एकही अर्ज नव्हता, त्यामुळे स्थानिक राजकारणात संभ्रमाचे वातावरण होते.मात्र आज ( १४ नोव्हेंबर) चौथ्या दिवशी अचानक परिस्थिती बदलली आणि नगराध्यक्षपदासाठी सहा जणांनी थेट निवडणूक कार्यालयात उपस्थित राहून अर्ज दाखल केले.

 

⬛ निधी भूतडा केंद्रस्थानी

 

या सहा उमेदवारांमध्ये निधी नितीन भूतडा यांची उमेदवारी सर्वाधिक चर्चेत आहे.उमरखेड शहरात भूतडा परिवाराचा सामाजिक प्रभाव, संघटनातील मजबूत पकड, आणि अलिकडच्या काळात नितीन भूतडा यांनी केलेली कार्यकर्त्यांशीची बांधिलकी या सर्वांचे प्रतिबिंब त्यांच्या पत्नीच्या उमेदवारीत दिसून येत आहे.यामुळे नगराध्यक्षपदाची ही लढत अधिक चुरशीची होणार हे निश्चित मानले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या